दरोड्याची होती तयारी : गणेशपेठ पोलिसांची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घातक शस्त्रे जवळ घेऊन पहाटेच्या वेळी कॉटन मार्केट परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली.
गणेशपेठ पोलिसांचे पथक शनिवारी पहाटे २ च्या सुमारास कॉटन मार्केट परिसरात गस्त करीत असताना त्यांना एक खबर मिळाली. त्यावरून पोलिस कल्पना वाईन शॉपच्या जवळ पोहचले. तेथे आरोपी मुन्ना गोटी उर्फ तीन पत्ती उर्फ सय्यद शाकिब, सुशील प्रताप गुप्ता, आकाश मुन्नालाल गौर आणि पवन सुंदरलाल गौर हे आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांचा पाचवा साथीदार नाती उर्फ रोहित राजू ठाकुर पळून गेला. पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी चाकू, लोखंडी कटनी, पेचकस, मिरची पावडर आणि नायलॉन दोरी जप्त केली. ठाणेदार भारत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रियाज मुलानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
फरार झालेल्या आरोपी नाती ठाकूरचा पोलीस शोध घेत आहेत.
---