महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 08:19 AM2021-03-29T08:19:05+5:302021-03-29T08:19:33+5:30
Nitin Raut News : महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप आहे. भाजपाची सत्ता असताना त्यांनी हेतुपुरस्सरपणे केलेल्या गैरव्यवस्थापनामुळे आज महावितरणवर थकबकीचा डोंगर उभा राहिला आहे.
नागपूर : महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप आहे. भाजपाची सत्ता असताना त्यांनी हेतुपुरस्सरपणे केलेल्या गैरव्यवस्थापनामुळे आज महावितरणवर थकबकीचा डोंगर उभा राहिला आहे. प्रचंड थकबाकी वाढवून महावितरणचे खासगीकरण करण्याची रणनीती भाजपने आखली होती. मात्र आम्ही ही थकबाकी वसूल करून खासगीकरणाचे हे संकट टाळण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे अस्वस्थ झालेले भाजपाचे नेते ठिकठिकाणी महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना लक्ष्य करीत आहेत, अशी टीका राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली.
भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावचे अधीक्षक अभियंता शेख यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा निषेध ऊर्जामंत्री राऊत यांनी
केला.
भाजप नेत्यांनी कायदा हाती घेऊन अधिकारी-कर्मचारी यांना मारहाण करणे व त्यांच्या वीज बिल वसुलीच्या कामात अडथळे निर्माण करणे हे चुकीचे कृत्य असून असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी
दिला.
प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी संकटात सापडली असून ग्राहकांनी वीज भरून कंपनीला संकटातून बाहेर काढावे, असे आवाहनही त्यांनी केले.