लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील ताराबाेडी (ता. काटाेल) येथील १७ वर्षीय विद्यार्थिनीने तिच्या घरी कुणीही नसताना शुक्रवारी (दि. २९) आत्महत्या केली. ‘सुसाईड नाेट’ व तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला. मात्र, आराेपीस शाेधण्यास पाेलिसांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे आराेपीस तातडीने अटक करावी व आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी केली आहे.
अमर रूपलाल गदाई (२०, रा. म्हसेपठार-माेहपा, ता. कळमेश्वर) असे पसार आराेपीचे नाव आहे. ती मेटपांजरा (ता. काटाेल) येथील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीची विद्यार्थिनी हाेती. अमरने तिला २५ जानेवारी २०२१ राेजी पळून जाण्यासाठी आग्रह केला हाेता. तिने नकार दिल्याने तिचे अश्लील फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही अमरने तिला दिली हाेती. हा प्रकार तिने वडिलांना सांगितला हाेता. वडिलांनी तिची समजूतही काढली हाेती. त्यानंतर तिने घरी छताला साडी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली.
याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि ३०६ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. राजकीय दबावामुळे त्याला अटक करण्यात पाेलीस दिरंगाई करीत असल्याचा आराेप तिच्या वडिलांनी केला असून, त्याच्यावर फसवणुकीचा तसेच ‘सुसाईड नाेट’मध्ये नमूद असलेल्या मुद्द्यांच्या आधारे इतर गुन्हे दाखल करण्याची मागणीही वडिलांनी केली आहे. दुसरीकडे, आराेपीचा शाेध सुरू असून, त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याची तसेच चाैकशीअंती संबंधित गुन्हे नाेंदविण्यात येणार असल्याची माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली.