गुरुवारी रात्री ९.३० वाजता अजनी रेल्वे क्वाॅर्टर निक्षु चौक येथे शुभलक्ष्मी आटा चक्कीच्या भिंतीजवळ अंधारात काही इसम प्राणघातक शस्त्र बाळगून दरोडा टाकण्याची चर्चा करीत होते. दरम्यान पोलीस आल्याचे पाहून तिघे पळून गेले. यातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. निखिल ऊर्फ मोनु विजय बागुल (२७) रा. बाबुलखेडा मस्जिदजवळ, आदित्य संदीप बोबाटे (२३) रा. अजनी रेल्वे क्वाॅर्टर, तौकीर ऊर्फ बादशाह ऊर्फ चिंटु नियामत कुरेशी (१९) रा. अजनी रेल्वे क्वाॅर्टर, सतीश ऊउर्फ मोंटु जगन्नाथ पाल (३०) रा. ८५ प्लॉट, गावंडे ले-आऊट, प्रमोद ऊर्फ पप्पू अशोक हरडे (३०) रा. रमानगर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील ओम ऊर्फ चिन्ना राठोड रा. अजनी रेल्वे क्वाॅर्टर, स्नेहांकित ऊर्फ छोटु शेंद्रे रा. अजनी रेल्वे क्वाॅर्टर, प्रतीक सुनील खोब्रागडे रा. कुकडे ले-आऊट या पळून गेलेल्या आरोपींकडून एक तलवार, चाकू, मिरची पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पळून गेलेल्या आरोपीपैकी ओम ऊर्फ चिन्ना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहायक पोलीस निरीक्षक महादेव पाटील, खेमराज पाटील, रणजित शेलकर, निलेश इंगळे, मनोज नेवारे, अतुल दवंडे, हंसराज पाऊलझगडे, रितेश गोतमारे, रोशन वाडीभस्मे यांनी केली.
...........
मोबाईल हिसकावून काढला पळ
नागपूर :सायकल घेऊन आपल्या कामावर जाणाऱ्या इसमाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीस तसेच विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे. २९ जुलैला सकाळी ५.४५ वाजता नरेश विनायक उमाळे रा. आंबेडकरनगर, धरमपेठ हे सायकलने आपल्या कामावर जात होते. आकाशवाणी बसस्टॉपसमोर मागाहून येणाऱ्या ऑटोतील २० ते ३० वर्षाच्या लाल शर्ट घातलेल्या इसमाने त्यांच्या हातातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन ऑटोरिक्षा चालकासह पळ काढला. गुन्हे शाखेने मोबाईल ट्रेसिंगची माहिती मिळताच आरोपी आदित्य ऊर्फ गब्बर विकास बब्बर (१८) रा. जाधव डेकोरेशनजवळ, बारसेनगर, सुमित परसराम गौर (२७) रा. लाजेवार यांच्या घरी, गांधी पुतळा यास अटक केली आहे. आरोपीकडून मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेला ऑटो जप्त केला आहे.
.............