माैदा : गावालगतच्या शिवारात शाैचास गेलेल्या एकाला लुटमार करणाऱ्या दाेन चाेरट्यांना अराेली पाेलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून दुचाकी, माेबाइल हॅण्डसेट असा एकूण २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही घटना अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील निमखेडा शिवारात साेमवारी (दि.१) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
येशूप्रसाद दत्तात्रय पांढरे (२६, रा. रेवराल, ता. माैदा) व विनाेद केशवराव येवतकर (२६, रा. वकीलपेठ हनुमाननगर, इमामवाडा, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. साेमवारी रात्रीच्या सुमारास खेमराज दयाराम किरणापुरे (४७, रा. निमखेडा, ता. माैदा) हे गावालगतच्या शिवारात शाैचास गेले हाेते. अशात आराेपींनी खेमराज यांना पकडून लाथाबुक्कीने मारहाण करीत जखमी केले. शिवाय, आराेपींनी त्यांच्याकडील एमएच-४०/यू-२३२७ क्रमांकाची दुचाकी (किंमत २०,००० रुपये) तसेच १,५०० रुपये किमतीचा माेबाइल हॅण्डसेट असा एकूण २१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून नेला. घटनेची सूचना पाेलिसांना देण्यात आली. मंगळवारी (दि.२) गावकऱ्यांनी दाेन्ही आराेपींना पकडून ठेवले हाेते. दरम्यान, पाेलिसांनी निमखेडा गाठून दाेघांनाही अटक केली. त्यांच्याकडून चाेरीचा मुद्देमाल हस्तगत केला.
याप्रकरणी खेमराज दयाराम किरणापुरे यांच्या तक्रारीवरून अराेली पाेलिसांनी भादंवि कलम ३९४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपींना अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस निरीक्षक अशाेक काेळी करीत आहेत.