नागपूर : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजप नेत्यांकडून वारंवार धमकी दिली जात आहे, असा आरोप करीत या विरोधात काँग्रेसने गुरुवारी व्हेरायटी चौकात आंदोलन केले. यानंतर शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात धडक देत संबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
आ. विकास ठाकरे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आ. ॲड. अभिजीत वंजारी, माजी आ. अशोक धवड, प्रदेश महासचिव व उद्योग व वाणिज्य सेलचे प्रमुख अतुल कोटेचा, सोशल मिडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, महासचिव उमाकांत अग्निहोत्री, गिरीश पांडव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.
यावेळी विलास मुत्तेमवार म्हणाले, राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेसह आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटविण्याची मागणी केली. सामाजिक न्यायाचा आवाज बुलंद करण्याचा त्यांच्या उद्देश आहे. मात्र, भाजपसह त्यांच्या मित्रपक्षातील नेते उघडपणे राहुल गांधी यांना धमक्या देत आहेत. याचा निषेध त्यांनी नोंदविला. आ. विकास ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करणारे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड, खा.अनिल बोंडे, केंद्रिय मंत्री रविनत बिटटू, तरविंदरसिंह मारवा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. आंदोलनात तानाजी वनवे, महासचिव डाॅ.गजराज हटेवार, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, कमलेश समर्थ, प्रा.दिनेश बानाबाकोडे, मिलींद दुपारे, वसीम खान, रमेश पुणेकर, लंकेश ऊके, दिनेश तराळे, राजेश पौनीकर, विश्वेश्वर अहिरकर, किशोर गीद, वासुदेव ढोके, दयाल जसनानी, डाॅ.मनोहर तांबुलकर,नॅश अली, महेश श्रीवास, मनीष चांदेकर, तौषिक अहमद, ज्ञानेश्वर ठाकरे, मेहुल आडवानी, सुकेसिनी डोंगरे, सुनिल पाटिल,राजेश साखरकर,श्रीकांत ढोलके, देवेद्र रोटेले, प्रमोद ठाकुर, पंकज निघोट, आकाश तायवाडे, अजय नासरे, पृथ्वी मोटघरे, प्रविण गवरे, ईरशाद मलिक, गजेद्र भिसीकर आदींनी भाग घेतला.