उमरेड : आराेपीने दारूच्या नशेत घरात शिरून तरुणीचा विनयभंग केला. यादरम्यान पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्याला अटक केली. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उदासा येथे शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
शुद्धाेधन मुरारी रंगारी (२८, रा. उदासा, ता. उमरेड) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. आराेपी दारूच्या नशेत पीडित तरुणीच्या घरी आला व ‘मला तुझा माेबाईल नंबर दे. तू हॅडसम आहे. तुला पैसे किती पाहिजे?’ असे तिला म्हटले. ही बाब पीडित तरुणीने आपल्या पतीला सांगितली. यावरून पीडिताच्या पतीने आराेपीला हटकले असता, आराेपीने त्यांनाही धमकी दिली. याप्रकरणी पीडिताच्या तक्रारीवरून उमरेड पाेलिसांनी भादंवि कलम ३५४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला. आराेपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक खाेब्रागडे करीत आहेत.