कन्हान : सार्वजनिक ठिकाणी अवैधरीत्या शस्त्र बाळगत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आराेपीस पाेलिसांनी अटक करीत त्याच्याकडील शस्त्र जप्त केले. ही कारवाई कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री येथील हरिहरनगरात गुरुवारी (दि. ३) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
प्रदीप ऊर्फ गाेलू देवानंद (२७, रा. हरिहरनगर, कांद्री, ता. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. तो गुरुवारी रात्री हरिहरनगरातील चाैकात हातात तलवार घेऊन फिरत हाेता. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली व नंतर सूचनापत्र देऊन साेडून देण्यात आले. त्याच्याकडून तलवार जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार रामटेके करीत आहेत.