लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : मैत्रिणीचे अश्लील फाेटाे व व्हिडीओ क्लिप तयार करून तिचा विनयभंग करणाऱ्या आराेपीस कामठी (जुनी) पाेलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. १७) रात्री ९ वाजताच्या सुमारास त्याला तेलंगणा पाेेलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली.
दीपक आनंदराव भोने (३२, रा. सावरखेड, ता. मोर्शी, जिल्हा अमरावती) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याची जगीदारगुट्ट, जिल्हा रंगारेड्डी, तेलंगणा येथील ३२ वर्षीय तरुणीशी मैत्री झाली हाेती. त्याने तिचे अश्लील फाेटाे व व्हिडीओ क्लिप तयार करून तिला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे तिने दीपकच्या विराेधात जगीदारगुट्ट पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. पाेलिसांनी भादंवि ३५४ (ड) अन्वये गुन्हा नाेंदवून प्रकरण तपासात घेतले.
दरम्यान, आराेपी कामठी (जुनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळताच कामठी पाेलिसांना सूचना देण्यात आली. पाेलिसांनी त्याच्या माेबाइल क्रमांकावरून त्याचा शाेध घेत त्याला अटक केली आणि जगीदारगुट्टचे पाेलीस निरीक्षक रवींद्र रेड्डी यांच्या स्वाधीन केले. त्याच्याविराेधात माेर्शी पाेलीस ठाण्यात चाेरी व इतर गुन्ह्यांची नाेंद असल्याची माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली. त्याच्याकडून पाच हजार रुपयांचा माेबाइल जप्त केला आहे. ही कारवाई सहायक फौजदार तंगराज पिल्ले, गयाप्रसाद वर्मा, महेश कठाने, पंकज कांबळे, उपेंद्र आकोटकर, स्वाती चेटुले, सुचित गजभिये, शैलेश यादव यांच्या पथकाने केली.