लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : शहजाद लईक शेख (३०, रा. नरखेड) याच्या खूनप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दाेघांना घटनेच्या सहा तासात अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, व्याजाने घेतलेली रक्कम आणि आईला केलेली अश्लील शिवीगाळ यामुळे त्याचा खून केल्याचे दाेघांनीही पाेलिसांना सांगितले.
अन्वर शेख वल्द शेख गफूर (२०, रा. मिरची प्लाट, वरूड, जिल्हा अमरावती) व राजेश सुरेश धुर्वे (२१, रा. ताजनगर, वरूड, जिल्हा अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. अन्वरने शहजादकडून व्याजाने रक्कम घेतली हाेती. त्यामुळे शहजादने अन्वरकडे वारंवार पैशाची मागणी करायला सुरुवात केली. रक्कम मिळत नसल्याने शहजादने अन्वरच्या घरी जाऊन त्याच्या आईला अश्लील शिवीगाळ केली हाेती. त्यामुळे अन्वरने बदला घेण्याची याेजना आखली.
अन्वरने राजेशच्या मदतीने शहजादला मंगळवारी (दि. १०) रात्री माेवाड नजीकच्या परसाेडी शिवारात बाेलावले. तिथे त्याच्याशी भांडण करीत त्याच्यावर चाकूने गळा चिरून त्याचा खून केला व दाेघांनीही लगेच घटनास्थळाहून पळ काढला.
दरम्यान, बुधवारी (दि. ११) सकाळी मृताची ओळख पटली व नरखेड पाेलिसांसाेबच स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेच्या तपासाला सुरुवात केली. अवघ्या सहा तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दाेन्ही आराेपींना वरूड शहरातून ताब्यात घेत चाैकशीला सुरुवात केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच नरखेड पाेलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून दाेघांनाही अटक केली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, सहायक पाेलीस निरीक्षक अनिल राऊत, उपनिरीक्षक जावेद शेख, सहायक फाैजदार जयप्रकाश शर्मा, साहेबराव बहाळे, हवालदार राजेंद्र सनाेडिया, दुर्गाप्रसाद पारडे, विनाेद काळे, शैलेश यादव, प्रणय बनाफर, अजिज शेख, आशुताेष लांजेवार यांच्या पथकाने केली.
...
पाच दिवसांची पाेलीस काेठडी
दाेन्ही आराेपींना पाेलिसांनी गुरुवारी (दि. १२) नरखेड येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. बी. राठाेड यांच्या न्यायालयासमाेर हजर केले हाेते. न्यायालयाने दाेघांनाही साेमवार (दि. १६)पर्यंत म्हणजेच पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. अन्वरने शहजादचा भाजीपाला कापण्याच्या चाकूने खून केला आणि चाकू फेकून दिला. पाेलीस काेठडी काळात त्याच्याकडून चाकू व इतर साहित्य जप्त करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.