शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नागपुरात सराफ व्यापाऱ्यांना गंडविणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 7:38 PM

स्वत:ची खोटी ओळख दाखवून आणि बनावट धनादेश देऊन सराफा व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी बुधवारी अटक केली.

ठळक मुद्दे बनावट ओळख देऊन करायचा फसवणूक : तहसील पोलिसांनी बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:ची खोटी ओळख दाखवून आणि बनावट धनादेश देऊन सराफा व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी बुधवारी अटक केली. आशुतोष महाजन असे या भामट्याचे नाव आहे.सराफा व्यापारी दुकान बंद करीत असताना अचानक दुकानात जायचे. घरी पूजा सुरू आहे. त्यामुळे सोन्याचे दागिने अथवा नाणी हवी आहे, असे सांगून घाई गडबडीत व्यापाऱ्याकडून नाणी किंवा सोन्याचे दागिने विकत घ्यायचे. त्या बदल्यात त्याला धनादेश द्यायचा आणि गायब व्हायचे, अशी या भामट्याची कार्यपद्धती आहे. त्याने दोन वर्षात नागपूरसह अनेक ठिकाणच्या सराफा व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा घातला आहे. ९ जुलैला रात्री ७ च्या सुमारास इतवारीतील सराफा व्यापारी उत्तम गुलाबचंद कश्यप यांच्या सराफा दुकानात आरोपी असाच शिरला. डॉ. महाजन अशी स्वत:ची ओळख सांगून त्याने कश्­यप यांना मी तुमचा जुना ग्राहक आहे, मला तातडीने सोन्याचे १० ग्रॅम आणि ५ ग्रॅमचे नाणे पाहिजे असे म्हटले.कोरोनामुळे दुकान बंद करण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे आज नाणे देता येणार नाही, असे कश्यप यांनी महाजनला सांगितले असता घरी धार्मिक विधी सुरू आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दोन नाणी पाहिजे, असे सांगून महाजनने कश्­यप यांना गळ घातली. त्यामुळे त्यांनी १० आणि ५ ग्रॅम अशी १५ ग्रॅमची दोन सोन्याची नाणी महाजनला दिली. ७८,४१४ रुपयांची सोन्याची नाणी घेऊन महाजनने कश्यप यांना धनादेश दिला. घाईगडबडीत रक्कम आणली नाही, पूजा सुरू असल्यामुळे तुम्ही आता धनादेश घ्या, असे सांगून महाजनने कश्­यप यांना जबरदस्तीने धनादेश दिला. हा धनादेश बँकेत जमा केला असता तो वटलाच नाही. आरोपीने दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क केला असता प्रतिसाद मिळत नव्हता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे कश्यप यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदविली. ठाणेदार जयेश भांडारकर आणि त्यांच्या सहकाºयांनी चौकशी करून आरोपी महाजनला बुधवारी फसवणुकीच्या आरोपात अटक केली.अनेक व्यापाऱ्यांची धावमहाजनला अटक करण्यात आल्याचे कळताच इतवारी, नंदनवन, हुडकेश्वरसह १० ते १५ सराफा व्यापाऱ्यांनी तहसील पोलीस ठाण्यात धाव घेतली. या भामट्याने आपलीही लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांना तक्रार देण्याची सूचना केली.फरार, बोगस डॉक्टरप्राथमिक चौकशीत आरोपी आशुतोष महाजन हा बोगस डॉक्टर असल्याचेही स्पष्ट झाले. स्वत:ची ओळख तो डॉक्टर महाजन अशी द्यायचा. मात्र चौकशीत त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आढळले नाही. तहसील पोलिसांनी बुधवारी त्याला रमना मारोती परिसरातून ताब्यात घेतले.

वणीतही गुन्हा दाखलमहाजन हा मूळचा वणी (जि. यवतमाळ) येथील रहिवासी आहे. तेथे बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो वणीतून फरार झाला. गेल्या सहा महिन्यांपासून यवतमाळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वणीतून पळ काढल्यानंतर त्याने नागपुरातील महाल भागात आणि नंतर नंदनवनमध्ये लपूनछपून वास्तव्य सुरू केले होते.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसArrestअटकfraudधोकेबाजी