लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या कळमना फळे बाजारात संत्रा आणि मोसंबीची आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्यावर्षी १ ते २० सप्टेंबरदरम्यान दोन्ही फळांची १४१ क्विंटल तर यंदा याच कालावधीत ६,५२९ क्विंटल आवक झाली. दोन्ही फळांची आवक वाढल्याने भावात घसरण झाली आहे. सध्या संत्र्याला दर्जानुसार ७५० ते २,३७५ रुपये क्विंटल भाव मिळाला. तर गेल्यावर्षी याच कालावधीत २,८७५ ते ३,०२५ रुपये क्विंटल भाव मिळाला होता. याशिवाय मोसंबीच्या किमतीतही गेल्यावर्षीच्या तुलनेत बराच फरक आहे. या महिन्यात २० दिवसात ७४,६६० क्विंटल मोसंबी कळमना बाजारात विक्रीसाठी आली. मोसंबीला ८५० ते २,३०० रुपये भाव मिळाला. तुलनात्मरीत्या गेल्यावर्षी याच काळात २० दिवसात ३,७५४ क्विंटल मोसंबीची आवक झाली होती. आवक कमी झाल्याने भाव जास्त मिळाले होते. अर्थात, १५०० ते ४,१०० रुपये क्विंटल असे दुप्पट भाव होते.
कळमन्यात संत्रा आणि मोसंबीची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 1:27 AM
सध्या कळमना फळे बाजारात संत्रा आणि मोसंबीची आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्यावर्षी १ ते २० सप्टेंबरदरम्यान दोन्ही फळांची १४१ क्विंटल तर यंदा याच कालावधीत ६,५२९ क्विंटल आवक झाली.
ठळक मुद्देगेल्यावर्षीच्या तुलनेत भाव घसरले