अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 09:41 PM2019-04-23T21:41:41+5:302019-04-23T21:42:54+5:30

नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. ३० एप्रिलपासून पुढील २८ दिवसांसाठी ही रजा असेल, असे निर्देश न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले आहेत.

Arun Gawli gets parole for 28 days | अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर

अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर

Next
ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. ३० एप्रिलपासून पुढील २८ दिवसांसाठी ही रजा असेल, असे निर्देश न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले आहेत.
२९ एप्रिल रोजी मुंबईत लोकसभा निवडणुका आहेत. जर अरुण गवळीला संचित रजा दिली तर मुंबईची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असा युक्तिवाद राज्य शासनातर्फे न्यायालयासमोर करण्यात आला. तर याअगोदर जेव्हा जेव्हा गवळीला ‘पॅरोल’ किंवा ‘फर्लो’वर सोडण्यात आले आहे, त्याने कुठल्याही नियमांचा भंग केलेला नाही किंवा कायदा-सुव्यवस्थेला ठेच पोहोचेल असे कृत्य केलेले नाही, अशी बाजू बचावादरम्यान अधिवक्ता राजेंद्र डागा आणि मीर नगमान अली यांनी मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून मुंबईत लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर म्हणजेच ३० एप्रिलपासून गवळीची संचित रजा मंजूर केली. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या केल्याच्या आरोपात गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. काही दिवसांअगोदरच गवळीने कुटुंबीयांना भेटण्यासाठी तुरुंग प्रशासनाकडे संचित रजेचा अर्ज केला होता. मात्र प्रशासनाने अर्ज नामंजूर केला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

Web Title: Arun Gawli gets parole for 28 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.