नागपूर : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव व ‘मशाल’ चिन्ह देण्याचे जाहीर केले. या निर्णयानंतर नागपुरातील शिवसैनिकांनी एकत्र येत मशाली पेटविल्या व उद्धव ठाकरे यांच्यासोबत ताकदीने उभे राहण्याचा संकल्प केला.
शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे यांच्या नेतृत्त्वात पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले. पेटत्या मशाली उंचावत शिवसेना जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या पेटत्या मशालीसारखा प्रत्येक शिवसैनिक पेटून उठेल व ठाकरे कुटुंबीयांवर वाकडी दृष्टी टाकणाऱ्यांना भस्म केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार नितीन तिवारी यांनी व्यक्त केला. तर दीपक कापसे यांनी प्रत्येक शिवसैनिक मशाल धगधगत ठेवेल, असा संकल्प केला.
यावेळी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष नितीन नायक, मुन्ना तिवारी, विभाग प्रमुख विशाल कोरके, अभिषेक धुर्वे, नीलिमा शास्त्री, श्रीकांत खंडाडे, गौरव मोहोड, रमेश काकडे आदी उपस्थित होते.