मंगेश व्यवहारे, नागपूर: कन्हान वॉटर ट्रीटमेंट प्लँटवर ९०० एमएमच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हचे नूतनीकरण, इनटेक विहिरीच्या आतील ६०० एमएम डक-फूट बेंड बदलविणे व लकडगंज-१ जलकुंभावर ६०० एमएम इनलेट वॉटर पाइपलाइनवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक एफएमची स्थापना करण्यासाठी महापालिकेने २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजतापासून २९ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजेपर्यंत शटडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कन्हान वॉटर ट्रीटमेंट प्लँट १८ तासांसाठी बंद राहणार असल्याने ४ झोनमधील वस्त्यांचा पाणीपुरवठा ठप्प होणार आहे.
आशीनगर झोनमधील बिनाकी व बिनाकी -१, बिनाकी-२ जलकुंभ, उप्पलवाडी एनआयटी जलकुंभ, इंदोरा-१, इंदोरा-२, बेझनबाग, गमदूर, जसवंत जलकुंभातून ज्या वस्त्यांना पाणीपुरवठा होतो, तो होणार नाही. सतरंजीपुरा झोनमधील शांतिनगर, वांजरी-विनोबा भावेनगर, कळमना, बस्तरवारी, बस्तरवार-१, बस्तरवारी -२ जलकुंभाचाही पाणीपुरवठा बाधित होणार आहे. लकडगंज झोनमध्ये भरतवाडा, कळमना, सुभाननगर, मिनीमातानगर, भांडेवाडी, लकडगंज-१, लकडगंज-२, बाबुळबन, पारडी-१, पारडी- २ या जलकुंभाचाही पाणीपुरवठा बाधित होणार आहे, तर नेहरूनगर झोनअंतर्गत नंदनवन, नंदनवन -१, ताजबाग, खरबी, सक्करदरा-३, वाठोडा या जलकुंभाचा पाणीपुरवठा बाधित होणार असून, येथून पाणीपुरवठा होणाऱ्या वस्त्यांनाही दोन दिवस पाणी मिळणार नाही.