लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी/हिंगणा/कळमेश्वर/सावनेर/रामटेक/काटाेल/माैदा/नरखेड : नागपूर जिल्ह्यातील काेराेना संक्रमणाचा चढता आलेख रविवारी (दि. २८) देखील कायम राहिला. रविवारी नागपूर शहरासह ग्रामीण भागात एकूण ३,९७० काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यातील ५८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १५८ रुग्ण कामठी तालुक्यात आढळून आले असून, हिंगणा तालुक्यात १००, कळमेश्वर तालुक्यात ७०, रामटेक तालुक्यात ५५, काटाेल तालुक्यात ५४, कामठी तालुक्यात ५१, त्याखालाेखाल सावनेर तालुक्यात तर माैदा तालुक्यात ३२ आणि नरखेड तालुक्यात सात नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली आहे.
कामठी तालुक्यात रविवारी १५८ रुग्ण आढळून आले आहेत. यात कामठी शहर व तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात सर्वाधिक रुग्ण महादुला व त्याखालाेखाल काेराडी येथे आढळून आहेत. हिंगणा तालुक्यात काेराेनाच्या १०० नवीन रुग्णांची भर पडली आहे. या नवीन रुग्णांमध्ये वानाडोंगरी शहरातील ४७, हिंगणा शहरातील १०, इसासनी येथील आठ, रायपूर व डिगडोह येथील प्रत्येकी सहा, नीलडोह येथील पाच, वडगाव (गुजर), मांडव-घोराड व सावंगी-देवळी येथील प्रत्येकी दाेन, देवळी-आमगाव, गोंडवाना, खापरी (मोरेश्वर), टाकळघाट, कोतेवाडा, गुमगाव, वागदरा (गुमगाव), देवळी-सावंगी, कान्होलीबारा, सालई (दाभा) व मेटाउमरी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहेे. या १०० रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ५,६५० झाली असून, यातील ४,७०९ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. शिवाय, ११९ रुग्णांचा आजवर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कळमेश्वर तालुक्यातही रविवारी ७० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील १८ तर ग्रामीण भागातील ५२ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील ५२ रुग्णांमध्ये घोराड येथील पाच, उबाळी, मांडवी, म्हसेपठार, कोहळी, सुसंद्री, तेलगाव, तेलकामठी, तिष्टी (बु.) येथील प्रत्येकी चार, मोहपा शहरातील तीन, पानउबाळी व सवंद्री येथील प्रत्येकी दाेन तसेच वाढोणा, पिपळा, तोंडाखैरी, सोनेगाव, तिडंगी, नांदिखेडा, जुनेवानी व सोनोली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.