लोकमत न्यूज नेटवर्क रामटेक :रामटेक मतदारसंघातून आमदार आशिष जयस्वाल यांना महायुतीचे उमेदवार जाहीर करण्यावर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. २०१९ च्या निवडणुकीत युतीधर्म न पाळत भाजप उमेदवाराविरोधात लढणाऱ्या जयस्वाल यांची उमेदवारी रद्द करण्याची आग्रही मागणी करत रामटेक मतदारसंघातील भाजप नेते व पदाधिकारी सोमवारी आक्रमक झाले.
मनसर येथील भाजपच्या कार्यालयात मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात रामटेकची जागा भाजपनेच लढावी ही भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला. जयस्वाल यांची उमेदवारी कायम राहिल्यास गुरुवारी (दि.१७) पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वपदाचे राजीनामे देणार आहेत. यासंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांना राजीनामे घेऊन रामटेक येथील शांती मंगल कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पारशिवनी येथील सभेत जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली होती. तसेच जयस्वाल हे मूळचे शिवसैनिक असल्याचे सांगत त्यांचा शिंदेसेनेत अधिकृत प्रवेश केला होता. शिंदे यांनी जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर करताच रविवारी रात्रीच याबाबत रामटेकमध्ये याचे पडसाद उमटले.
भाजप पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर जयस्वाल यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. भाजपचा एकही पदाधिकारी पारशिवनी येथील सभेत मंचावर उपस्थित नसताना जयस्वाल यांची परस्पर उमेदवारी कशी जाहीर करण्यात आली, असा सवाल स्थानिक भाजप नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी तातडीचे बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ भाजप पुन्हा मैदानात अशा घोषणाही देण्यात आल्या. बैठकीला माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले, रामटेक पंचायत गाठली होती. त्यांनी भाजपचे माजी आ. सुधीर पारवे यांना पराभूत केले. मात्र, लोकसभा निवडणुकीत राजू पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेस सोडली व शिंदेसेनेकडून निवडणूक लढविली. त्यांचा पराभव झाला. आता विधानसभा निवडणुकीत राजू पारवे यांना शिंदेसेनेकडून उमरेडची उमेदवारी मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा आहे. राजू पारवे हे पराभवानंतरही शिंदेसेनेसह महायुतीच्या प्रत्येक कार्यक्रम व मेळाव्यात सक्रिय आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे राजू पारवे यांच्या उमेदवारीसाठीही जोर लावतील, अशी समर्थकांना आशा आहे. असे असले तरी आ. जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उमरेडचा कुठलाही उल्लेख केला नाही. त्यामुळे ही जागा आता शिंदेसेनेला सुटेल की भाजपच लढेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तर लोकसभेसारखा निकाल लागेल
- गत दोन दशकांपासून भाजपचे वरिष्ठ नेते स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता जयस्वाल यांच्या आग्रह पूर्ण करीत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे कमळ चिन्ह तसेच सरकारच्या योजना घराघरांत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना आग्रह धरतात. मग राज्यस्तरावरच नेते उमेदवारीचे निर्णय घेत असतील तर रामटेकमध्ये भाजपचे काय अस्तित्व काय राहील, असाही सवाल यावेळी करण्यात आला.
- जयस्वाल यांच्याबाबत राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका कायम राहिल्यास रामटेक विधानसभेत लोकसभेसारखा निकाल लागेल, असेही मत काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत नोंदविले.