नागपूर : आदिवासी विकास विभागातील प्रकल्प अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांची यादी सोमवारी सायंकाळी जाहीर झाली. मागील चार महिन्यांपासून रिक्त असल्याने प्रभारावर चालत असलेल्या नागपूर आदिवासी विकास प्रकल्पाला आता पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत.
नागपूरचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिगांबर चव्हाण यांच्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या बदलीपासून हे पद रिक्तच होते. सहायक प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांच्याकडे प्रभार होता. आता या पदावर गडचिरोलीहून अशोक वाहणे विनंती बदलीवरून आले आहेत. ते अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे वरिष्ठ संशोधन अधिकारी होते, तर सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून शोभा चव्हाण अमरावतीहून नागपूरला येत आहेत.
...
१० अधिकाऱ्यांच्या बदल्या
यावेळी एक आणि दोन श्रेणीतील १० अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून बदल्या झाल्या आहेत. यात शिवानंद पेढेकर (सहायक आयुक्त, अमरावती), विनोद पंडित (अ.ज. प्रमाणपत्र तपासणी समिती विधी अधिकारी, अमरावती), दक्षा बोराळकर (सहायक प्रकल्प अधिकारी, पुसद), मोहनकुमार व्यवहारे (सहायक प्रकल्प अधिकारी, अकोला), छंदक लोखंडे (प्रकल्प अधिकारी, कळमनुरी), कैलाश खेडकर (सहायक प्रकल्प अधिकारी, घोडगाव), सुप्रिया चव्हाण (सहायक प्रकल्प अधिकारी, ठाणे) नितीन कोपुलवार (अ. जा. प्रमाणपत्र तपासणी समिती संशोधन अधिकारी, पुणे) यांचा समावेश आहे.
...