शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

गळा दाबून पतीची हत्या

By admin | Published: May 17, 2017 2:00 AM

अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची हत्या करून तो अपघाताने मेल्याचा बनाव करणाऱ्या स्वाती नितीन नायर

अपघाताचा बनाव : महिलेचे बिंग फुटले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची हत्या करून तो अपघाताने मेल्याचा बनाव करणाऱ्या स्वाती नितीन नायर (वय २५) नामक महिलेविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. नितीन रमेश नायर (वय २७) असे मृताचे नाव आहे. रमेश नायर मूळचे केरळमधील रहिवासी आहे. रोजगाराच्या निमित्ताने ते बैतूल (मध्य प्रदेश) येथे स्थायिक झाले होते. स्वाती हिचे पहिले लग्न झाले अन् काडीमोडही झाला. त्यानंतर नितीनसोबत तिचे दुसरे लग्न झाले होते. नितीनने काही वर्षांपूर्वी भोपाळला टायरचे शोरूम सुरू केले अन् ते पत्नीसह तेथेच राहू लागले. औषधोपचाराच्या निमित्ताने नितीन आणि स्वाती नागपुरात आले होते. २९ एप्रिलला रात्री १० ते १०. ३० च्या सुमारास नितीनचा पायरीवरून पडल्याने मृत्यू झाल्याचा स्वातीने कांगावा केला होता. बजाजनगर पोलिसांनाही तशी माहिती दिली होती. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, शवविच्छेदनात गळा दाबून हत्या झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. नितीनचा भाऊ हरगोविंद रमेश नायर (वय २५) यानेही पोलिसांना स्वातीच्या प्रेमप्रकरणाचा उलगडा करणारे काही पुरावे दिले. पोलीस पथक केरळकडे नितीनचा खाली पडून मृत्यू झाल्याचा कांगावा करणारी स्वाती त्याच्या अंत्यसंस्कारानंतर लगेच आईवडिलांसोबत केरळला निघून गेली. धडधाकट नवऱ्याचा तिने एकटीने गळा कसा दाबला, नितीनने तिचा प्रतिकार का केला नाही, की यावेळी स्वातीसोबत दुसरा कोणता आरोपी होता, आदी प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी पोलीस स्वातीला अटक करण्यासाठी केरळकडे निघाले आहे.