लाेकमत न्यूज नेटवर्क
टाकळघाट : आपसी वादातून एकाने रस्त्याने जाणाऱ्या तरुणावर चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या पाेलीस कर्मचारी व पाेलीस मित्रावर आराेपींनी चाकूहल्ला करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, पाेलिसांनी आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदवून चाैघांना अटक केली आहे. ही घटना टाकळघाट येथील गांगापूर झाेपडपट्टी येथे मंगळवारी (दि.४) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
नितीन लाेणारे (३९), वैभव लाेणारे (२७) दाेघेही रा. टाकळघाट आणि पाेलीस नाईक प्रफुल्ल राठाेड (४३, रा. काॅलाेनी शिरूळ) अशी जखमींची नावे असून, मानसिंग नानकसिंग टाक (३५, रा. गांगापूर, टाकळघाट), नयन दत्तू कडू (२१, रा. कारला राेड, वर्धा), अतुल अंकुश निमसडे (२१, रा. आंजी (वर्धा) व लीलाधर धर्मदेव कुंभरे (२७, रा. गाेंड माेहल्ला, वर्धा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. आराेपी मानसिंग याच्याशी वस्तीतील काही नागरिकांशी आपसी वाद हाेता. अशात आराेपीने आपला मेहुणा रवींद्रसिंग कालू व त्याच्या इतर साथीदारांना वर्धेवरून बाेलावून वस्तीतील नागरिकांशी वाद घातला. हा वाद सुरू असताना रस्त्याने पायी जात असलेल्या नितीन लाेणारे या तरुणावर एकाने चाकूहल्ला करीत गंभीर जखमी केले. याबाबत कुणीतरी बुटीबाेरी एमआयडीसी पाेलिसांना भ्रमणध्वनीद्वारे सूचना दिली. पाेलीस घटनास्थळी पाेहोचताच आराेपी आपल्या दुचाकी तेथेच साेडून झाेपडपट्टीत लपून बसले. त्यामुळे काही पाेलीस कर्मचारी त्यांना शाेधण्यासाठी गेले. दरम्यान, पाेलीस नाईक प्रफुल्ल राठाेड यांनी पाेलीस मित्राच्या मदतीने आराेपीच्या दाेन दुचाकी मालवाहू वाहनात टाकत असताना जवळच लपून बसलेल्या आराेपीने पाेलीस मित्र वैभव लाेणारे याच्यावर चाकूहल्ला केला. ही बाब ध्यानात येताच वैभव वळला व त्याच्या मागील बाजूस चाकू शिरला. वैभवला वाचविण्यासाठी पाेलीस नाईक राठाेड यांनी आरडाओरड केल्याने आराेपींनी त्यांच्यावरही चाकूहल्ला करीत जखमी केले. अशात इतर पाेलीस कर्मचारी धावून आल्याने आराेपी तेथून पसार झाले. दरम्यान, पाेलिसांनी मध्यरात्रीपर्यंत आराेपींची शाेधमाेहीम राबवून चाैघांना ताब्यात घेत अटक केली. या घटनेतील आराेपी रवींद्रसिंग कालू व अन्य एक आराेपी फरार आहे.
याप्रकरणी बुटीबाेरी एमआयडीसी पाेलिसांनी आराेपींविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३३२, ३२४, ३५३, १४३, १४७, १४८, १४९, सहकलम ४/२५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, चाैघांना अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस निरीक्षक विनाेद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.