आरोपीचे नाव सुगनी आहे. अनवर शहा (२८, रा. वनदेवीनगर झोपडपट्टी) हा मित्र मनोज चंदनप्रसाद गुप्तासोबत गंगा-जमुना परिसरात पापड विकत होता. दरम्यान, सुगनीने मनोजकडून पापड घेतले. मनोजने पैसे मागितल्यामुळे सुगनीला राग आला. त्याने चाकू काढून मनोजवर हल्ला केला. मनोज पळून गेला. तो काही दूर धावून थांबला. सुगनीही तेथे पोहचला. त्याने मनोजला चेहऱ्यावर आणि कमरेला चाकू मारून गंभीर जखमी केले. लकडगंज पोलिसांनी मनोजच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला.
------------
गुन्हेगारांना शस्त्रांसह अटक
नागपूर : गुन्हे शाखा पथकाने दोन गुन्हेगारांना धारदार शस्त्रांसह अटक केली.
अजय प्रभाकर पाहुणे (४६, रा. इमामवाडा झोपडपट्टी) व अरमान ऊर्फ गोलू विजय मोगरे (२३, रा. कुंजीलालपेठ, अजनी) अशी गुन्हेगारांची नावे आहेत. अजय तलवार घेऊन गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. अजयसोबत अरमानलाही चाकूसह पकडण्यात आले. अजयविरुद्ध १९ तर, अरमानविरुद्ध ३ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध शस्त्र कायद्यांतर्गत नवीन गुन्हे नोंदविण्यात आले.
--------------
युवकाला जखमी करून लुटले
नागपूर : कळमना मार्केटजवळ एका युवकाला जखमी करून लुटण्यात आले.
रवी नान्हे असे जखमीचे नाव आहे. त्याची कळमना मार्केटमध्ये कॅन्टीन आहे. तो गुरुवारी पहाटे कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी मोटरसायकलने जात होता. दरम्यान, तीन गुन्हेगारांनी लाथ मारून त्याला खाली पाडले. तसेच, ते रवीजवळचे १० हजार ४०० रुपये व मोबाईल लुटून फरार झाले. कळमना पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
-------------
बेलतरोडीत चोरी
नागपूर : बेलतरोडी येथे एका घरातून रोख रकमेसह एकूण २ लाख ३५ हजार रुपयाचा माल चोरण्यात आला. अशोक काटे असे फिर्यादीचे नाव असून ते शुभांगी ले-आऊट येथील रहिवासी आहेत. ते बुधवारी सायंकाळी घराबाहेर गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आरोपीविरुद्ध बेलतरोडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.