लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी छातीची ढाल करून पुढे सरसावलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना (एपीआय) राज्य सरकारने पदोन्नतीची सुखद लस दिली आहे. त्यानुसार आजपासून ४३८ एपीआय आता पीआय झाले आहेत.
राज्य पोलीस मुख्यालयातून मंगळवारी एक यादी जाहीर झाली आहे. त्यात ४३८ सहायक निरीक्षकांना निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात नागपूर शहरातील १७, गुप्तवार्ता विभाग, लोहमार्ग आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६ तर नागपूर ग्रामीणमधील ५ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विनायक विश्वास पाटील, पंकज दत्तात्रय घाडगे, भीमा नरके, संजय परदेशी, अमर नामदेव काळंगे, गजेंद्र पांडुरंग राऊत, अरविंद निवृत्ती घाडगे, विश्वास शंकर भास्कर, सतीश दत्तराम महल्ले, रवी नागोसे, बयाजीराव कुरळे, नरेंद्र निस्वादे, राखी गेडाम, युनूस मुलानी, विशाल काळे, सचिन शिर्के, अमोल काचोरे, विकास कानपिल्लेवार, मंगेश काळे, गाैरव कृष्णराव गावंडे, श्याम गोविंद गव्हाणे, शिवाजी भांडवलकर, सचिन गणपतराव मेहत्रे, प्रवीण नाचणकर, श्याम आदिनाथ आपटे, समाधान पवार, अमिता जयपूरकर आणि सचिन गिरधारी पवार अशी त्यांची नावे आहेत.
कोरोना संसर्गाचा धोका वाढल्याने बंदोबस्तासाठी फ्रंटवर येऊन लढण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना ‘पदोन्नतीच्या या लसी’मुळे सुखद अनुभूती मिळाली आहे.
----