लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सहायक पोलीस निरीक्षक राजू डोर्लीकर यांच्या दिघोरीतील निवासस्थानी आग लागल्यामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. चोरट्यांनी ही आग लावली असावी असा संशय आहे.डोर्लीकर सध्या वडसा देसाईगंज येथे कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या परिवारातील सदस्य सुद्धा त्यांच्या जवळच राहतात. गुरुवारी एका कामाच्या निमित्ताने डोर्लीकर यांचा मुलगा नागपुरात आला होता. खूप महिन्यापासून घर बंद असल्यामुळे त्याने मित्राकडेच थांबणे पसंत केले. दरम्यान, शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास घराला आग लागल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांचे शेजारी तिजारे यांनी पोलीस आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली. मात्र ते तेथे पोहचण्यापूर्वी घरातील सोन्याचांदीचे दागिने, घराचे विक्रीपत्र, फ्रिज, वॉशिंग मशीन, कपडे, कपाट आणि फर्निचर असे सुमारे पाच लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. घरात चोरटे शिरले असावे आणि मौल्यवान चीज वस्तू हाती लागली नसल्यामुळे बाहेर पडताना त्यांनी घराला आग लावून दिली असावी, असा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या घराला आग : घातपाताचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:21 AM
सहायक पोलीस निरीक्षक राजू डोर्लीकर यांच्या दिघोरीतील निवासस्थानी आग लागल्यामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. चोरट्यांनी ही आग लावली असावी असा संशय आहे.
ठळक मुद्देलाखोंचे साहित्य जळाले