लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्ज घेऊन आयडीबीआय बँकेला कोट्यवधी रुपयांनी ठगविण्याच्या प्रकरणात सूत्रधार प्रशांत बोरकरच्या साथीदाराला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटकेतील आरोपी ताजने ले-आऊट, वडधामणा येथील योगीराज ऊर्फ भास्कर आदे (३२) आहे. योगीराज याच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील आरोपींची संख्या १३ झाली आहे.योगीराजने पीक कर्ज घेऊन आयडीबीआय बॅँकेच्या गोधनी शाखेला १ कोटी ७४ लाख रुपयांचा चुना लावला होता. या प्रकरणात पोलिसांनी सूत्रधार प्रशांत बोरकर त्याचा साथीदार राजेश गुहे, संतोष नंदागवळी, अनिल घोडे, सारंग चिटकुले, सचिन चिटकुले, विक्रांत कंगाले, रामाजी भेंडे, जसवंतसिंह प्रधान, पतिराम बावनकर, लखनलाल राठौड व योगीराज बिटले यांना अटक केली आहे. या प्रकरणातील सूत्रधार बोरकर याने बँकेत बोगस दस्तावेज सादर करून बँकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला होता. त्याने स्वत:ला शेतकरी सांगून खोट्या सातबाऱ्यांच्या आधारे कर्ज घेऊन जमीन बँकेकडे गहाण ठेवली होती.या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आयडीबीआय बँकेच्या भंडारा येथील खोखर्ला शाखेत बोगस दस्तावेज सादर करून अडीच लाख रुपयांचे पीककर्ज गोदामासाठी घेतल्याचे आढळले होते. यात योगीराज आदे, सारंग चिटकुले, सचिन चिटकुले, जसवंतसिंह प्रधान, राजेश गुहे, प्रशांत बोरकर सहभागी होते. आरोपींनी भुशाला तांदूळ दाखवून कर्ज मिळविले होते. तांदळाच्या पोत्याच्या जागी भुशाचे पोते दाखवून अधिकाऱ्यांना फसविले होते. आर्थिक शाखेच्या तपासणीत हा घोटाळा पुढे आला होता. बँकेने भंडारा येथे तक्रार दाखल केली होती.दोन्ही घोटाळ्यात प्रशांत बोरकर नंतर योगीराज आदे यांची महत्त्वाची भूमिका होती. योगीराज हा बोगस दस्तावेज बनविण्यात सक्रिय होता. तो वाहनचालकाचे काम करतो. गुन्हे शाखा आठवडाभरापासून योगीराजचा पाठलाग करीत होती. सोमवारी रात्री तो पोलिसांच्या हाती लागला. तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल काळे यांनी त्याला न्यायालयात सादर केले. त्याला १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. योगीराज बोरकर याच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. सूत्रांच्या मते या प्रकरणात बँकेच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. संशय आहे की अधिकाऱ्यांनी दस्तावेजाची गंभीरतेने निरीक्षण केले नाही. आरोपींकडून एकाच बँकेला ठगविण्यात आल्यामुळे या प्रकरणाचा संशय अधिक वाढला आहे.
आयडीबीआयला ठगविणाऱ्या सूत्रधाराचा साथीदार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:50 AM
कर्ज घेऊन आयडीबीआय बँकेला कोट्यवधी रुपयांनी ठगविण्याच्या प्रकरणात सूत्रधार प्रशांत बोरकरच्या साथीदाराला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटकेतील आरोपी ताजने ले-आऊट, वडधामणा येथील योगीराज ऊर्फ भास्कर आदे (३२) आहे. योगीराज याच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील आरोपींची संख्या १३ झाली आहे.
ठळक मुद्देशेतकरी सांगून मिळविले कर्ज : १३ आरोपींना आतापर्यंत झाली अटक