कन्हान/माैदा : नागपूर जिल्ह्यात चाेरीच्या घटनांमध्ये वाढ हाेत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अट्टल चाेरट्यांच्या टाेळीस अटक करण्यात यश मिळविले. या टाेळीने सहा ठिकाणी घरफाेड्या केल्याचे उघड झाले असून, त्यांच्याकडून एकूण १ लाख ८३ हजार ५४४ रुपयाचा ऐवज जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई कन्हान लगतच्या माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये तरुण ऊर्फ तुफान अशाेक मेश्राम (१८, रा. कामठी), विक्रांत ऊर्फ गाेलू विजय मेश्राम (२४, रा. सैलाबनगर, कामठी), विक्की ऊर्फ ईडी राजू बाेरकर (२२, रा. कामगारनगर, कामठी) व माेहम्मद माेईन फकरे आलम (२१, रा. आझादनगर, कामठी) या चाैघांचा समावेश आहे. जिल्ह्यात चाेरीचे प्रमाण वाढत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चाेरट्यांच्या शाेधात हाेते. ते पथक शुक्रवारी (दि. ११) रात्री माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना त्यांनी तरुण मेश्रामला संशयित म्हणून ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितल्याने याच पथकाने तातडीने उर्वरित चाेरट्यांना अटक केली.
त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपयाचे २५ ग्रॅम साेन्याचे दागिने, १२ हजार रुपयाचा माेबाईल, ८,५४४ रुपयाचे १९२ ग्रॅम चांदीचे दागिने, ४३ हजार रुपयाचे दाेन एलसीडी टीव्ही असा एकूण १ लाख ८३ हजार ५४४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक सचिन मत्ते व नरेंद्र गाैरखेडे, सहायक फाैजदार लक्ष्मप्रसाद दुबे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.
...
सहा घरफाेड्या उघड
या टाेळीने माैदा, अराेली, कन्हान, पारशिवनी व कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा ठिकाणी घरफाेडी केल्याचे कबूल केले आहे. यात गुमथळा, काटाेल राेड कळमेश्वर, निमखेडा, कुंभार माेहल्ला पारशिवनी व कन्हान शहरातील घरफाेड्यांचा समावेश आहे. त्यांनी दिवसा व रात्रीच्या वेळी घरफाेड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून चाेरीच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यता पाेलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.