काेंढाळी : काटाेल पंचायत समितीच्या सभागृहात अटल भूजल याेजनेंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. यात वरिष्ठ भूजल तज्ज्ञांनी तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांना विस्तृत मार्गदर्शन केले. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा नागपूरच्या डॉ. वर्षा माने यांनी सांगितले की, काटोल तालुक्यात भूमिगत पाण्याची पातळी खाली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील गावे झपाट्याने डार्क शेडमध्ये जात आहेत. यावर उपाययाेजना करण्यासाठी पावसाचे पाणी संकलन करणे, विहिरी व विंधन विहिरींचे पुनर्भरण करणे अत्यावश्यकक असून, यावर डाॅ. वर्षा माने यांनी तांत्रिक बाबींवर विस्तृत मार्गदर्शन केले. खंडविकास अधिकारी संजय पाटील यांनी प्रास्ताविकातून अटल भूजल योजनेबाबत माहिती दिली. शिवाय, प्रस्तावित गावांमध्ये विहिरी व विंधन विहिरींचे पुनर्भरण करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन करीत जलसुरक्षा आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला पंचायत समितीचे अधिकारी, पाणीपुरवठा याेजनेचे उप अभियंता, जलसंधारण अधिकारी, कृषी अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. डॉ. वर्षा माने यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
काटाेल येथे अटल भूजल याेजना कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:08 AM