शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अटल महाआरोग्य शिबिर; दुर्धर आजाराच्या ४२ हजार रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:06 AM

प्रत्येक गरीब व गरजू रुग्णांना नि:शुल्क आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ४२ हजार १५५ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

ठळक मुद्दे नेत्ररोगाचे सर्वाधिक रुग्णकर्करोगाच्या १८७ रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येक गरीब व गरजू रुग्णांना नि:शुल्क आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ४२ हजार १५५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. एकाच ठिकाणी विविध दुर्धर आजारांच्या एवढ्या मोठ्या संख्येतील रुग्णांची तपासणी व औषधोपचार करण्याची शहरातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. शिबिरात ४५० वरिष्ठ डॉक्टर, १०० अधिपरिसेविका, ४५० आशा वर्कर, १०० फार्मासिस्ट व जवळपास अडीच हजार स्वयंसेवकानी आपली सेवा दिली.दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील नागरिकांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या या शिबिरात रुग्णांनी ७ वाजतापासूनच येण्यास सुरुवात केली होती. ८ वाजतापासून रुग्णांची नोंदणी सुरू झाली. नोंदणी कक्षात असलेल्या इंटर्न्स व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी रुग्णांची नोंदणी घेत त्यांची स्वतंत्र फाईल तयार करून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करीत होते. रुग्णांची संख्या मोठी असलीतरी कुठेच गर्दी नव्हती. शिस्तबद्ध पद्धतीने रुग्णांना उपचार व औषधे उपलब्ध करून देण्यात आले होते. शिबिरात सुपर स्पेशालिटी तज्ज्ञ उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेक रुग्णांच्या आजाराचे निदान होऊन पुढील उपचाराची दिशाही ठरली. परिणामी शिबिरातून बाहेर पडताना रुग्णांच्या चेहºयावर समाधान दिसून येत होते.

१८२७ रुग्णांना चष्म्यांचे वाटपमहाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, महाआरोग्य शिबिराला ४२,१५५ रुग्णांनी उपचार घेतले. यातील ८९७५ रुग्ण नेत्ररोगाशी संबंधित आहेत. १८२७ रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. उर्वरित रुग्णांमध्ये मोतिबिंदू, काचबिंदू व इतरही आजाराचे रुग्ण आहेत. त्यांच्यावर लवकरच उपचार व शस्त्रक्रियेचे नियोजन केले जाईल. उपचारापासून एकही रुग्ण वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही जोशी म्हणाले.

डेंग्यू, स्क्रब टायफसच्याही रुग्णांनी घेतला उपचारनेत्ररोगानंतर सर्वाधिक गर्दी मेडिसीन विभागात होती. सायंकाळपर्यंत ७१२५ रुग्णांनी उपचार घेतले. विविध आजारांसोबतच डेंग्यू व स्क्रब टायफसच्या रुग्णांचाही समावेश होता. पुढील उपचारासाठी त्यांना मेयो, मेडिकलमध्ये तर काहींना खासगी रुग्णालयात बोलविण्यात आले.

हिप, नी रिप्लेसमेंट व स्पाईनचेही रुग्णप्रामुख्याने वृद्ध लोकांमध्ये गुडघे (नी) व कंबरेच्या खुब्याचा (हिप) आजार मोठ्य़ा प्रमाणात आढळून येतो. यावरील प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दीड लाख ते चार लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. परंतु महाआरोग्य शिबिरात अशा सर्व रुग्णांना शासनाच्या योजनेत समावून त्यांच्यावर नि:शुल्क उपचार केले जाणार आहेत. शिबिरात स्पाईनसह, जुन्या फ्रॅक्चरच्या रुग्णांवर उपचार करून पुढील उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात बोलवून घेण्यात आले. विशेष म्हणजे, हजारावर रुग्णांची ‘बीएमडी’ तपासणीही करण्यात आली. शिबिरातील या अस्थिव्यंगोपचाराचा बाह्यरुग्ण विभाग लक्ष वेधून घेणारा ठरला.

औषध वितरणाची विशेष सोयशिबिरात औषध वितरणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, बाह्यरुग्ण विभागातून बाहेर पडलेल्या रुग्णाला औषध वितरण विभागापर्यंत घेऊन जाण्यासाठी स्वयंसेवकांनी आपली भूमिका चोख बजावली.

महाआरोग्य शिबिरात रुग्णाचा मृत्यूअटल महाआरोग्य शिबिरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. विजय कांबळे असे मृत रुग्णाचे नाव आहे. उपलब्ध माहितीनुसार, विजय कांबळे हे शिबिरात नोंदणी केंद्राकडे जात असतानाच त्यांना अचानक चक्कर आली व खाली पडले. स्वयंसेवकांनी त्यांना उचलून तातडीने डॉक्टरांकडे घेऊन गेले. मेडिकलच्या अपघात विभागातील डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत्यू झाल्याची माहिती दिली.

‘ब्रेस्ट कॅन्सर’ची तपासणीशिबिरात सहभागी झालेल्या बहुसंख्य महिलांची यंत्राद्वारे ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची तपासणी करण्यात आली. या शिवाय १८७ कॅन्सर रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी रुग्णालयात बोलावून घेतले आहे. यावेळी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी विशेष सेवा दिली.

टॅग्स :Healthआरोग्य