लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिपाइं (आठवले) चे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अलीकडे राज्याच्या राजकारणात रिपब्लिकन पक्षाला काहीही भवितव्य नाही, असे वक्तव्य केले आहे. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने यांनी त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत आठवले हे रिपब्लिकन राजकारणाचे लाभार्थी आहेत, भाष्यकार नाही, अशी टीका केली आहे.आठवले यांनी केवळ स्वत:पुरते मर्यादित सत्तेचे राजकारण केले. अलीकडे ते भाजपच्या मेहरबानीवर केंद्रीय मंत्री झाले. तेच त्यांचे बोलविते धनी आहेत, असेही अॅड. माने यांनी म्हटले आहे. रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही असे आठवले यांना वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नावातून रिपब्लिकन शब्दाला हद्दपार करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
रिपब्लिकन राजकारणाचे आठवले लाभार्थी , भाष्यकार नाही : सुरेश माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 9:57 PM
रिपाइं (आठवले) चे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अलीकडे राज्याच्या राजकारणात रिपब्लिकन पक्षाला काहीही भवितव्य नाही, असे वक्तव्य केले आहे. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने यांनी त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत आठवले हे रिपब्लिकन राजकारणाचे लाभार्थी आहेत, भाष्यकार नाही, अशी टीका केली आहे.
ठळक मुद्दे रामदास आठवले यांच्या वक्तव्याचा निषेध