नागपूर : वर्धमाननगर येथील स्थानक जैन भवनात पर्युषण पर्वा अंतर्गत अंतगड सूत्र वाचन, कल्पसूत्र वाचन आदी विविध आयामांसोबतच प्रवचन महोत्सव सुरू आहे.
येथे चातुर्मासासाठी राष्ट्रसंत आचार्य सम्राट गुरुदेव आनंदऋषी म.सा. यांच्या शिष्या तेला तप आराधना चंदनबाला म.सा., पद्मावती म.सा., चारूप्रज्ञा म.सा., सूर्यवंदना म.सा., शासनवंदना म.सा., वितराग वंदना ठाणा - ६ उपस्थित आहेत. शुक्रवारी साध्वी पद्मावती म.सा. यांनी ‘अतिथी देवो भव:’ या विषयावर प्रवचन दिले. ‘अतिथी देवो भव:’ ही अमूल्य अशी भारतीय परंपरा असून, घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत देवतेसमान करणे अभिप्रेत आहे. जिनशासन अतिथी व्रताला श्रेष्ठतम मानले जाते. आधुनिक काळात व्यक्ती इतका व्यस्त झाला आहे की इतरांचे सत्कार-सन्मान करण्याचा त्याला विसर पडला आहे. ज्या घरात पाहुण्यांचा सत्कार होतो, ते घर नेहमी धनधान्याने समृद्ध असते, असा उपदेश त्यांनी यावेळी दिला.
तप साधनेच्या श्रृंखलेत शुक्रवारी प्रदीप रांका यांचे १४ उपवास, शोभा जैन यांचे १६ उपवास, गौतम लुनावत यांचे ८ उपवास, माधव गोलाईक यांचे ७ उपवास झाले. चंदनबाला म.सा. यांचा ५० दिवसांपासून उपवास-आम्बिल तप निरंतर सुरू आहे. पद्मावती म.सा. यांचे अडीच वर्षांपासून निरंतर एकासना तप आणि चारूप्रज्ञा म.सा. यांचे वर्धमान-आयम्बिल तप सुरू आहे. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावण संघ व श्रमण संघ नागपूरच्या संयोजकांनी श्रावकांना शनिवारी ११ सप्टेंबर रोजी संवत्सरी महापर्वावर धर्मध्यान, साधना-आराधना करण्याचे आवाहन केले आहे.
............