शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

‘अ‍ॅट्रोसिटी’ कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी; संघाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 8:49 PM

अन्याय व अत्याचार थांबविण्यासाठी बनविण्यात आलेल्या ‘अ‍ॅट्रोसिटी’सारख्या कायद्यांचे कठोरपणे पालन झाले पाहिजे, असे मत संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयाशी संबंध नसल्याची स्पष्टोक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाने ‘अ‍ॅट्रोसिटी’ कायद्याच्या वापरासंदर्भात दिलेल्या निर्णयाचा आमच्याशी काहीही संबंध नसल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केले आहे. संघ कायम जातीभेद व जातीच्या आधारावर होणाऱ्या अत्याचारांचा विरोध करत आला आहे. अशा प्रकारचे अन्याय व अत्याचार थांबविण्यासाठी बनविण्यात आलेल्या ‘अ‍ॅट्रोसिटी’सारख्या कायद्यांचे कठोरपणे पालन झाले पाहिजे, असे मत संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे.संघातर्फे भय्याजी जोशी यांच्या प्रतिपादनाचे पत्रकच जारी करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालाच्या निर्णयाच्या विरोधात होणारा हिंसाचार अयोग्य आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयावरून संघाच्या संदर्भात सुरू असलेला अपप्रचार दुर्भाग्यपूर्ण आहे. न्यायालयाच्या त्या निर्णयाशी संघाचा सुतराम संबंध नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात केंद्रसरकारने फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय अगदी योग्य असल्याचे भय्याजी जोशी यांनी प्रतिपादन केले आहे. समाजातील बुद्धिवंतांनी परस्पर सामंजस्य व स्नेहभाव अबाधित रहावा यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच कुणाच्याही भडकवण्यात न येता नागरिकांनी सामाजिक प्रेम, सौहार्द आणि विश्वास कायम ठेवावा. कुठल्याही प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा