शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

नागपुरात पोलिसावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 1:22 AM

जरीपटका पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून तिघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. हल्ल्याच्या वेळी आरोपींनी धारदार आरीचा वापर केल्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला जबर दुखापत झाली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्रनगरातील बँक आॅफ बडोदाच्या बाजूला असलेल्या भारत पेट्रोल पंपावर आज सकाळी ७ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमारहाण करून आरीने हातावर वार : जरीपटक्यातील पेट्रोल पंपावर थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटका पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून तिघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. हल्ल्याच्या वेळी आरोपींनी धारदार आरीचा वापर केल्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला जबर दुखापत झाली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्रनगरातील बँक आॅफ बडोदाच्या बाजूला असलेल्या भारत पेट्रोल पंपावर आज सकाळी ७ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.जरीपटका ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी पद्माकर उके आज सकाळी त्यांच्या भाच्याला परीक्षा केंद्रावर नेऊन सोडण्यासाठी जात होते. पेट्रोल भरण्यासाठी ते महेंद्रनगरातील पेट्रोल पंपावर थांबले. तेथे वाहनधारकांची मोठी रांग होती. तेवढ्यात अचानक मागून दुचाकीवर दोघे जण आले आणि त्यांनी रांगेत न लागता सरळ पंपावरील कर्मचाऱ्याजवळ दुचाकी लावली. त्यामुळे रांगेत उभे असलेल्या वाहनधारकांनी त्यांना विरोध केला. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. ते पाहून पोलीस शिपाई उके यांनी आरोपींना मागे रांगेत उभे राहण्यास बजावले. आरोपींनी त्यांच्याशीही वाद घातला. त्यानंतर मोबाईलवरून फोन करून आपल्या एका साथीदाराला बोलविले. काही वेळेतच तिसरा आरोपी तेथे पोहचला. तोपर्यंत आरोपींसोबत उके यांची बाचाबाची सुरू होती. तिसरा आरोपी तेथे पोहचताच तिघांनीही उके यांना खाली पाडून जबर मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर धारदार आरीने हल्ला चढवला. बचावाचा पवित्रा घेतल्याने उके यांच्या हाताच्या कोपराला आरी लागली. त्यामुळे रक्ताची चिरकांडी उडाली. ते पाहून अन्य काही जण मदतीला धावले. या घटनेनंतर पेट्रोल पंपावर एकच खळबळ उडाली. जखमी उकेंनी जरीपटका पोलीस ठाण्यात माहिती कळवून मदत मागितली. पोलिसांचे वाहन तेथे पोहचण्यापूर्वीच आरोपी पसार झाले होते.यवतमाळ जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला चढवून गुन्हेगाराने त्याची हत्या केल्याचे वृत्त सोमवारी सकाळी पोलीस दलात खळबळ उडवून देणारे ठरले होते. त्यात नागपुरातही पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याबाबतच्या वृत्ताने भर पडली. दरम्यान, जखमी उकेंवर उपचार करून घेतल्यानंतर जरीपटका ठाण्यात त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. त्यानुसार, पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.विशेष म्हणजे, सरकारी कर्मचाऱ्यांवर खास करून, पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्यास आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात येतो. उके यांची आज साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे कलम ३५३ लावले नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.पंपावर सीसीटीव्हीच नाहीतआरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पेट्रोल पंपावर जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे प्रयत्न केले. मात्र, पंपावर सीसीटीव्ही कॅमेरेच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे दिवसभर ढुंडो ढुंडो रे साजना सुरू होते. रात्री ८ च्या सुमारास विक्की नामक एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून अन्य दोन आरोपींची नावे मिळवून पोलीस त्यांना अटक करण्यासाठी धावपळ करीत होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस