लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगर - एमआयडीसीत आपली दहशत निर्माण करण्यासाठीच कुख्यात गुंड निखिल ऊर्फ गोलू मानसिंग मलिये (वय २८, रा. सुर्वेनगर), निखिल विलास खरात (वय २२, रा. एकात्मतानगर) आणि त्याच्या साथीदारांनी कुख्यात गुंड सुमीत ऊर्फ शेरा सतीश चव्हाण (वय २७) याच्यावर प्राणघातक हल्ला चढवल्याचे स्पष्ट झाले आहे. शेराचा गेम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोलू आणि निखिलला प्रतापनगर पोलिसांनी अटक करून आज त्यांचा न्यायालयातून पीसीआर मिळवला.जुगार क्लब चालविणारा गणेश मेश्राम नंबरकारी असलेल्या शेराविरुद्ध दुहेरी हत्याकांडासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. शेराने प्रतिस्पर्धी टोळीतील निखिल खरात नामक गुन्हेगाराला गेल्या आठवड्यात मारहाण केली होती. शेराची या भागात दहशत वाढत असल्याने प्रतिस्पर्धी टोळीतील गुंड आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी शेराच्या मागावर होते. गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास जयताळ्यातील जयस्वाल बारमध्ये शेरा त्याच्या साथीदारासोबत दारू प्यायला गेल्याचे बघून गोलू मलिये, निखिल खरात आपल्या साथीदारांसह तेथे आले. शेरा मित्रांसह बारच्या बाहेर पडताच गोलू मलियेने शेराच्या मित्रांना सिगारेट आणायला पाठवले. मित्र बाजूला जाताच मलियेने शेराला आपल्याकडे बोलविले. तो जवळ येताच बाजूलाच असलेल्या निखिल खरात, शुभम आणि अन्य एका साथीदाराने शस्त्राचे सपासप घाव घालून शेराला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. तो खाली पडल्यानंतर आरोपींनी त्याला बाजूच्या विटा उचलून ठेचून काढले. बारचालकाने पोलिसांना फोन केला. त्यामुळे प्रतापनगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. पोलिसांनी शेराचा साथीदार अजिंक्य दिनकर नवरे (वय २१) याच्या तक्रारीवरून कुख्यात गोलू मलिये आणि निखिल खरातला अटक केली. गोलू मलिये त्या भागातील खतरानाक गुंड मानला जातो. या दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करून त्यांची चार दिवसांची कोठडी मिळवली. त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.शेराचे बयाण झालेच नाहीशेरा खामल्यातील एका खासगी इस्पितळात दाखल असून त्याची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांनी परवानगी दिली नसल्यामुळे पोलीस त्याचे बयाण आतापावेतो नोंदवू शकले नाही. तो कोमात जाण्याची भीती डॉक्टरांनी वर्तविल्याचे समजते.
वर्चस्व निर्माण करण्यासाठीच शेरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 10:50 PM
प्रतापनगर - एमआयडीसीत आपली दहशत निर्माण करण्यासाठीच कुख्यात गुंड निखिल ऊर्फ गोलू मानसिंग मलिये (वय २८, रा. सुर्वेनगर), निखिल विलास खरात (वय २२, रा. एकात्मतानगर) आणि त्याच्या साथीदारांनी कुख्यात गुंड सुमीत ऊर्फ शेरा सतीश चव्हाण (वय २७) याच्यावर प्राणघातक हल्ला चढवल्याचे स्पष्ट झाले आहे. शेराचा गेम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोलू आणि निखिलला प्रतापनगर पोलिसांनी अटक करून आज त्यांचा न्यायालयातून पीसीआर मिळवला.
ठळक मुद्देकुख्यात शेराची प्रकृती नाजूक : दोघांना अटक , चार दिवसांचा पीसीआर