श्रीहरी अणेंवरील शाईफेकीचा सर्व स्तरांतून निषेध : विदर्भवादी संतप्तनागपूर : राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अॅड.श्रीहरी अणे यांच्यावर नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे काही विदर्भविरोधकांनी शाई फेकल्याच्या घटनेची नागपुरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकाराचा सर्वच स्तरांमधून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा आवाज देशाच्या राजधानीत उंचावत असल्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखले व त्यातूनच हा विरोध झाला. हा विदर्भाच्या अस्मितेवरीलच हल्ला असल्याचे मत चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. कितीही हल्ले झाले तरी विदर्भाच्या आंदोलनाला तीव्र स्वरूप देणार असल्याचा मानस अनेकांनी व्यक्त केला. विदर्भवाद्यांमध्ये उत्साहनागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या आंदोलनाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिल्यामुळे विदर्भवाद्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अॅड.श्रीहरी अणे यांची केजरीवाल यांच्यासोबतची गुरुवारची भेट ऐतिहासिक ठरणार असून यामुळे विदर्भाच्या आंदोलनाला आणखी पाठबळ मिळाले आहे. दिल्लीत ‘आप’ने अभूतपूर्व क्रांती करून दाखविली. विदर्भाच्या आंदोलनातदेखील आता जास्त जनता जुळेल, अशी विदर्भवादी कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया होती.(प्रतिनिधी)
हा तर विदर्भाच्या अस्मितेवरच हल्ला
By admin | Published: April 01, 2016 3:12 AM