लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : वडधामना येथील घरफाेडी प्रकरणात वाडी पाेलिसांनी गुरुवारी (दि. २६) रात्री अट्टल चाेरट्यास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून १ लाख ६४ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला, अशी माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली.
आकाश सहारे (३४, रा. म्हाडा कॉलनी, ताजने ले-आऊट, आठवा मैल) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. बद्रीप्रसाद विजरबहादूर गुप्ता (६१, रा. भारतनगर सोसायटी, वडधामना) हे १४ जून ते १० जुलै या काळात कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले हाेते. याच काळात त्यांच्या घरी चाेरी झाली आणि चाेरट्याने १ लाख ३१ हजार ३७० रुपयाचे साेन्या-चांदीचे दागिने व २० हजार रुपये राेख असा एकूण १ लाख ५१ हजार ३७० रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला.
याप्रकरणी वाडी पाेलिसांनी भादंवि ४५७, ४५४, ३८० अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. ही चाेरी आकाशने केली असल्याची माहिती मिळताच, पाेलिसांनी त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देताच त्याला अटक केली. त्याच्याकडून त्याने विविध ठिकाणाहून चाेरून नेलेला १ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली. ही कारवाई दुय्यम पोलीस निरीक्षक भारत कऱ्हाडे, उपनिरीक्षक साजिद अहेमद, हवालदार सुनील मस्के, राजेश धाकडे यांच्या पथकाने केली.
...
आणखी एका घरफाेडीची कबुली
याच काळात पवन सुरेश आचार्य, रा. खडगाव राेड, वाडी यांच्याही घरी चाेरी झाली हाेती. त्यात चाेरट्याने त्यांच्या घरातून साेन्या-चांदीचे दागिने व माेबाईल फाेन असा एकूण ५८ हजार रुपयाचा मुद्देमाल चाेरून नेला हाेता. पवन आचार्य यांच्या घरी चाेरी केल्याचे आकाश सहारे याने कबूल केल्याची माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली असून, त्याच्याकडून चाेरीच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
270821\img-20210827-wa0092.jpg
फोटो