लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : नागपूर शहर, नागपूर ग्रामीण तसेच वर्धा जिल्ह्यात घरफाेडी करणाऱ्या चाेरट्यास वारंवार सूचना देऊनही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही. त्यामुळे त्याला दाेन वर्षांसाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी नुकतेच जारी केले. या काळात त्याला अमरावती शहरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
आशिष नारायण कुशवाह ऊर्फ दसचक्का (२२, रा. मरामाय नगर, काटाेल) असे या आराेपीचे नाव आहे. त्याने आजवर नागपूर शहर, नागपूर ग्रामीण व वर्धा जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांतर्गत घरफाेडी केल्या आहेत. चाेरीच्या घटनांमध्ये त्याला यापूर्वीही अटक करण्यात आली हाेती. वर्तनात सुधारणा करण्यासाठी त्याला काटाेल पाेलिसांनी वेळावेळी लेखी सूचनाही दिली हाेती. चाेरीच्या एका घटनेमध्ये त्याला काटाेल पाेलिसांनी नुकतीच अटक केली.
घराच्या झडतीदरम्यान त्याने चाेरून आणलेले साहित्य घरातील विद्युत फिटिंगच्या बाेर्डमध्ये लपवून ठेवल्याचेही पाेलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्यावर चाेरी, घरफाेडी व इतर २४ गंभीर गुन्ह्यांची नाेंद असल्याने तसेच वर्तनात सुधारणा हाेत नसल्याने ठाणेदार महादेव आचरेकर यांनी त्याच्या हद्दपारचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय पाेलीस अधिकारी नागेश जाधव यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्याकडे सादर केला. त्याअनुषंगाने श्रीकांत उंबरकर यांनी त्याला दाेन वर्षासाठी नागपूर शहर, जिल्हा व वर्धा जिल्ह्यातील दाेन वर्षासाठी हद्दपार केले आहे. या काळात त्याला अमरावती येथे राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. अन्य काही गुन्हेगारांच्या हद्दपारचे प्रस्ताव तयार केले जात असल्याची माहिती ठाणेदार महादेव आचरेकर यांनी दिली.