लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हमलापुरी फाटा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये दुचाकी वाहने चाेरणाऱ्या चाैघांना अटक केली आणि त्यांच्याकडून दाेन लाख रुपये किमतीच्या चार माेटरसायकली जप्त केल्या. ही कारवाई शनिवारी (दि. १९) रात्री करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये प्रीतम केशव मेंढे (२७), विकास ज्ञानेश्वर उके (२३), विलास रामाजी बघेल (२०) तिघेही हमलापुरी, ता. रामटेक व समीर वसंता डाेईफाेडे, रा. बेरडेपार, ता. माैदा या चाैघांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक परिसरात गस्तीवर असताना त्यांना हमलापुरी फाटा परिसरात प्रीतम, विकास व विलास विना क्रमांकाच्या माेटरसायकलने जात असल्याचे या पथकाला आढळून आले.
संशय आल्याने त्यांनी या तिघांनाही थांबवून त्यांच्याकडे असलेल्या माेटरसायकलबाबत विचारपूस केली. त्यांनी सुरुवातीला असंबद्ध उत्तरे दिली. नंतर मात्र ती माेटरसायकल समीरच्या मदतीने हिवराहिवरी (ता. रामटेक) शिवारातून चाेरून आणल्याचे सांगितले. त्यामुळे या पथकाने या तिघांसह समीरला ताब्यात घेत अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून चार माेटरसायकली जप्त केल्या.
त्या माेटरसायकलींची किंमत दाेन लाख रुपये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, हवालदार ज्ञानेश्वर राऊत, राजेंद्र रेवतकर, दिनेश अधापुरे, राेहन डाखाेरे, विपीन गायधने, अमाेल वाघ, अमाेल कुथे, सायबर सेलचे सतीश राठाेड यांच्या पथकाने केली.
...
पारशिवनी, माैदा येथील माेटरसायकली
या चाैघांनीही या चार माेटरसायकली रामटेक, अराेली (ता. माैदा), माैदा व पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून चाेरून आणल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या याच पथकाने शुक्रवारी (दि. १८) काटाेल परिसरात कारवाई करीत ज्ञानेश्वर वासुदेव गायकवाड (१९, रा. काटाेल) यास अटक केली. त्याच्याकडून दाेन माेटरसायकली व एक ॲक्टिव्हा जप्त केली. त्याने ही दुचाकी वाहने काटाेल, येरला (ता. कळमेश्वर) व पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश येथून चाेरून आणल्याचे पाेलिसांना सांगितले.