लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सराफा व्यापाºयाच्या मुलाचे क्रिकेट सट्ट्याची खयवाडी करणाºया बुकींनी कथित अपहरण करण्याचा प्रयत्न केला. लकडगंजमध्ये शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिसांनी या घटनेची माहिती कळताच तातडीने धावपळ करून मुख्य सूत्रधारासह दोघांच्या मुसक्या बांधल्या.सराफा व्यापारी सुनील जैन हे लकडगंजमधील छापरूनगर चौकाजवळच्या जयदेव अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा पारस (वय १८) नामक मुलगा बीबीएचा विद्यार्थी आहे. जितेश खंडवाणी, उमेश आणि कुणाल या तीन मित्रांसह पारस दोन दुचाक्यांवर फेरफटका मारून कुंभारटोलीत आला. दुपारी १ ते २ च्या सुमारास तेथे हे चौघे गप्पा करीत असताना अचानक काळ्या रंगाची होंडा सिटी आणि चॉकलेट रंगाची आय २० अशा दोन कार तेथे आल्या. कारमधील सात ते आठ तरुणांनी अचानक पारसवर झडप घातली. ते त्याच्या टी शर्टची कॉलर पकडून त्याला कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पारस आणि त्याच्या मित्रांनी तीव्र विरोध करून आरडाओरड केली. त्यामुळे शेजारची मंडळी धावली. ते पाहून आरोपी आपापल्या कारमध्ये बसून पळून गेले. जाता जाता एकाने पारसच्या गळ्यातील सुमारे पाच तोळ्यांची (४८ ग्राम) सोन्याची साखळी हिसकावून नेली. या घटनेच्या तब्बल दोन ते अडीच तासानंतर पारस त्याच्या वडिलांना घेऊन लकडगंज ठाण्यात पोहचला. ठाणेदार संतोष खांडेकर यांना त्याने आपले अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगून आरोपींनी सोनसाखळी हिसकावून नेल्याचेही सांगितले. सराफा व्यापाºयाच्या तरुण मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची बाब ऐकताच ठाणेदार खांडेकर यांनी आरोपींची नावे आणि त्यांच्या कारचे नंबर विचारले. पारसने चेतन तेलंग (वय २५, रा. नंदनवन) याचे नाव सांगितले. त्याचा मोबाईल नंबरही दिला. ही माहिती वरिष्ठांना कळवित ठाणेदार खांडेकर यांनी तपासाची सूत्रे वेगात फिरवली. आरोपी चेतनसोबत संपर्क करून तो आणि अन्य आरोपी कुठे आहे, त्याची माहिती घेणे सुरू केले. रात्री ७.३० च्या सुमारास पोलिसांनी चेतन तेलंग आणि स्वप्नील गुरदे (वय २४, रा. दोघेही मिरे लेआऊट नंदनवन) यांना भांडेप्लॉट परिसरातून अटक केली. त्यांना लकडगंज ठाण्यात आणण्यात आले. तोपर्यंत पोलीस उपायुक्त राहूल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद्र मुंडे यांच्यासह गुन्हेशाखेचाही ताफा ठाण्यात पोहचला होता. त्यांनी आरोपी चेतन आणि स्वप्निलची चौकशी सुरू केली.साडेपाच लाखांचा वादआरोपींपैकी चेतन तेलंग हा बुकी आहे. पारस याने गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये आपल्याकडे लगवाडी केली होती. आपले साडेपाच लाख रुपये त्याच्याकडे बाकी आहे. तो रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे आपण त्याला रक्कम मागण्यासाठी आलो होतो. त्याचा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपींनी इन्कार केला. आजूबाजूची मंडळी धावल्यामुळे पळून गेल्याचे सांगतानाच आरोपी तेलंगने त्याच्या सात साथीदारांचीही नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार, पोलीस त्यांना शोधण्यासाठी धावपळ करीत होते.संशयास्पद विलंबपोलीस अधिकाºयांच्या माहितीनुसार, पारसने सट्टा अन् साडेपाच लाखाच्या उधारीचा पोलिसांकडे इन्कार केला आहे. घटनेच्या दोन ते अडीच तासानंतर त्याने पोलीस ठाणे गाठले. त्याचा हा विलंबच या प्रकरणात संशय वाढवणारा ठरला आहे. तक्रार द्यायला एवढा विलंब का केला, अशी पोलिसांनी त्याला विचारणा केली. त्यावर त्याने ‘आपण घाबरलो होतो. घटना घडल्याबरोबर काय करावे, ते सुचले नाही. त्यामुळे मित्रांकडे जाऊन बसलो. वडिलांना सांगितले आणि त्यानंतर तक्रार देण्यासाठी आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्याच्याकडे चेतनचा मोबाईल क्रमांक कसा आला, तो त्याला कसा ओळखतो, या प्रश्नांची उत्तरे तो देऊ शकला नाही.
सराफा व्यापाºयाच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 1:28 AM
सराफा व्यापाºयाच्या मुलाचे क्रिकेट सट्ट्याची खयवाडी करणाºया बुकींनी कथित अपहरण करण्याचा प्रयत्न केला. लकडगंजमध्ये शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली होती.
ठळक मुद्देलकडगंजमध्ये खळबळ : दोघांना अटक, सहा फरार