लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत असताना उत्तर प्रदेशात अखिल भारतीय हिंदू महासभेच्या नेत्यांनी बनावट बंदुकीने गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तसेच हा पूर्णाकृती पुतळा जाळण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेसच्यावतीने रविवारी महाल भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयासमोर नारेबाजी करून घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनक र्त्यांना पोलिसांनी लगेच अटक केली.महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडण्याच्या विकृत घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे अखिल भारतीय सचिव बंटी शेळके, शहर अध्यक्ष तौसिफ खान, उपाध्यक्ष आकाश गुजर आदींच्या नेतृत्वात सरसंघचालकांना भेटून ‘मै हू गांधी मुझे भी गोली मारिये’आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी महाल येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून बाईक रॅली काढून नटराज टॉकीज, संघ मुख्यालय परिसरातील रस्त्यावरुन फिरून बडकस चौक, चिटणीस पार्क चौक ते अग्रसेन चौक मार्गे चितारओळ चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आदर व्यक्त केला. त्यानंतर सरसंघचालकांना निवेदन देण्यासाठी निघालेल्या कार्यक र्त्याना पोलिसांनी अटक केली.आंदोलनात श्रीकांत ढोलके, रोहित खैरवार,राहुल सिरिया, स्वप्निल ढोके,अक्षय घाटोळे,बाबू खान,संजू जावडे, प्रशांत धोटे, भूषण मरसकोल्हे, धीरज पांडे,अजित सिंग, इम्रान पल्ला, शाहबाज चिस्ती,फझलूर कुरेशी, अलोक कोंडापूरवार, वसीम शेख, आशिष दीक्षित,रितेश सोनी,आकाश चौरिया, अगस्तीन जॉन, अमनगौर, अॅथोनी डेनियल, रोनाल्ड मेश्राम, शाहिद खान, सुमित ढोलके,विजय हाथबुडे,मिलिंद धवड, तेजस मून, तुषार मदने, प्रज्वल शनिवारे,दुर्गेश हिंगणेकर, विक्की नटीये,राहुल मोहोड, नितीन जुमडे, अझर शेख,फरदिन खान,नईम शेख, आयुष हिरणवार, पंकेश निमजे,विजय मिश्रा, सागर चव्हाण, हेमंत कातुरे, स्वप्नील बावनकर, पवन चांदपूरकर,मधुचंद्र मोहोळ, दिनेश सातपुते यांच्यासह कार्यक र्त्यांचा समावेश होता.
संघ मुख्यालयाला घेरावचा प्रयत्न; गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडण्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 10:18 AM
अखिल भारतीय हिंदू महासभेच्या नेत्यांनी बनावट बंदुकीने गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेसच्यावतीने रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयासमोर नारेबाजी करून घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
ठळक मुद्दे युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक