काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट : सरकारविरोधात पर्दाफाश आंदोलननागपूर : देशभरात वाढत असलेली महागाई, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत न करणे तसेच केंद्र व राज्य सरकारमधील भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात आहे. याचा पर्दाफाश करण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी गांधीसागर तलाव, टिळक पुतळा येथील भाजप कार्यालयापुढे जोरदार नारेबाजी व निदर्शने करण्यात आली. काँग्रेसच्या काही संतप्त कार्यक र्त्यांनी भाजप कार्यालयावर धडक देत आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्याच्या प्रयत्नात पोलीस व कार्यकर्त्यांत चांगलीच झटापट झाल्याने काहीवेळ तणाव व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. काँग्र्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अनिस अहमद, नितीन राऊ त, शहर काँग्रेसचे सरचिटणीस अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके, नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, गुड्डू तिवारी, अजय हिवरकर यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक ,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवडणुकीपूर्वी काँग्र्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करून लोकांना ‘अच्छे दिन आनेवाले है’, विदेशातील काळा पैसा भारतात परत आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा होतील. महागाई कमी होईल. शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते. परंतु असे काहीही घडले नाही. दुसरीकडे केंद्र व राज्य सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांची चौकशी न करता त्यांना क्लीन चिट देऊन पाठीशी घातले जात आहे. असे असतानाही सरकार पारदर्शी असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहे. याचा पदार्फाश करण्यासाठी काँग्र्रेसने आंदोलन हाती घेतल्याची माहिती विकास ठाकरे यांनी दिली. (प्रतिनिधी)भ्रष्टाचारी मंत्र्यांना संरक्षणनिवडणुकीपूर्वी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजप नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. असे असूनही चौकशी न करता त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रकार सुरू आहे. दुसरीकडे सरकार पारदर्शी असल्याचा दावा पंतप्रधान व मुख्यमंत्री करीत आहेत. याचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात आंदोलन हाती घेण्यात आले आहे. जोपर्यंत भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा माणिकराव ठाकरे यांनी यावेळी दिला.
भाजप कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न
By admin | Published: August 28, 2015 3:17 AM