लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका विधवा मुलीवर तिच्या वडिलांनीच बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीत घडली.पीडित ३२ वर्षीय विवाहितेचा पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. तिला दोन मुलं आहेत. ती लोकांच्या घरी मोलकरणीचे काम करते. पती मरण पावल्याने ती आई-वडिलांसोबत राहत होती. तिचे आई-वडील एका निर्माणाधीन इमारतीत चौकीदारी करतात. तिला एक लहान भाऊ सुद्धा आहे. आरोपी वडिलाला दारूचे व्यसन आहे. त्यांची आपल्या मुलीवर अनेक दिवसांपासून वाईट नजर होती. परंतु ती समजू शकली नाही. काही दिवसांपासून मात्र तिचे वडील तिच्याशी लगट करू लागले. एक-दोनदा आपत्तीजनक व्यवहारही केला. त्यामुळे तिने वडिलांपासून दूर राहणेच पसंत केले. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता पीडित आपल्या घरी एकटी होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला आणि बळजबरी करू लागला. पीडितेने कसेबसे स्वत:ला मुक्त केले आणि ती घराबाहेर निघून आली. त्याचवेळी तिचा भाऊ सुद्धा आला. पीडितेने आपल्या भावाला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी आईला बोलावून घेतले. दरम्यान आरोपी फरार झाला. पीडितेने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
नागपुरात विधवा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 9:53 PM
एका विधवा मुलीवर तिच्या वडिलांनीच बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीत घडली.
ठळक मुद्देगिट्टीखदानमधील घटना