भूमाफिया ग्वालबन्सी टोळीचा प्रताप : ५०० कोटीची जमीन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वातंत्र्यापूर्वी पारसी समाजाला मिळालेली ५०० कोटी रुपये किमतीची जागाही भूमाफिया ग्वालबन्सी टोळीने बोगस दस्तऐवजाच्या मदतीने बळकावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा प्रकार पारसी समुदायाच्या लगेच लक्षात आल्याने ग्वालबन्सी टोळीची डाळ शिजू शकली नाही. काटोल रोड सीपीडब्ल्यूडी कॉलनीजवळ पारसी समाजाची १७.५० एकर जागा आहे. या जागेवर पारसी समाजाची सेमिनरी आहे. १९११ मध्ये नागपूरचे तत्कालीन राजे रघुजी भोसले यांनी पारसी ट्रस्टला ९९ वर्षाच्या लीजवर ही जागा वितरित केली होती. स्वातंत्र्यानंतर १९६० मध्ये महाराष्ट्र सरकारने या लीजचे नुतनीकरण करून २०१० पर्यंत केले. ग्वालबन्सी टोळीने बोगस दस्तऐवजच्या मदतीने ही जमीन १९०९ मध्ये त्यांच्या वडिलांची असल्याचे सांगितले होते. त्यांचे म्हणणे होते की, रघुजी राजांनी ही जमीन पारसी ट्रस्टला वितरित करणे गैरकायदेशीर होते. राजांनी घेतलेला हा निर्णय असल्याने त्याला आव्हान देता आले नाही. परंतु त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा लीजचे नुतनीकरण केले. ट्रस्टला मिळालेली ही जमीन १९०९ पासून त्यांच्या कुटुंबाची असल्याचा त्यांचा दावा होता. लीजचे नुतनीकरण थांबवून ही जमीन बळकावण्याचा ग्वालबन्सी टोळीचा प्रयत्न होता. या उद्देशाने ग्वालबन्सी आपल्या भरवशाच्या अधिकाऱ्यांसोबत पुणे येथील भूमी अभिलेख कार्यालयात पोहचले. या दिशेने प्रयत्न करण्यासाठी ते सक्रिय झाले. या दरम्यान ट्रस्टचे प्रमुख पारसी जाल यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने पाऊल उचलित भूमी अभिलेखसह सर्वांना नोटीस पाठविल्या. असे करताच ग्वालबन्सी बंधू आणि भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांनी माघार घेतली. या जमिनीची सध्या ५०० कोटी रुपये इतकी किंमत आहे. ग्वालबन्सी टोळीने ही जमीन बळकावण्यासाठी स्वातंत्र्यपूर्वीचे दस्तऐवजही तयार केले होते. आता पोलीस आपल्या दारी भूमाफिया ग्वालबन्सी टोळीद्वारे फसविल्या गेलेल्या पीडितांचा शोध घेण्यासाठी पोलीस आता अशा लोकांच्या घरी स्वत:च पोहोचत आहे. शहर पोलिसांनी पहिल्यांदाच या प्रकारचे पाऊल उचल्४ाले आहे. शहर पोलिसांनी ग्वालबन्सी टोळीशी संबंधित असलेल्यांच्या घरातून व कार्यालयातून सदस्यांकडून विक्रीपत्र जप्त केले आहे. पोलीस आठवडाभरापासून या विक्रीपत्रांचा तपास करीत होते. या दरम्यान ६० पेक्षा अधिक लोकांची माहिती पुढे आली. पोलिसांनी बुधवारपासून संबंधित लोकांकडे अधिकाऱ्यांना पाठविले. आज कळमेश्वर परिसरातील १७ लोकांशी संपर्क साधण्यात आला. विक्रीपत्राबाबत काही तक्रार आहे का, अशी विचारणा करण्यात आली. तक्रार असल्या कार्यालयात बोलावण्यात आले. असल्यास त्यांच्याकडून माहितीपत्र लिहून घेण्यात आले आहे. दरम्यान मंगळवारी ५० लाख रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी दिलीप ग्वालबन्सीला बुधवारी न्यायालयात सादर करून २० मेपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.
स्वातंत्र्यापूर्वीची जमीन बळकावण्याचा प्रयत्न
By admin | Published: May 18, 2017 2:27 AM