शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

नागपुरात बार मालकाचे अपहरण करून हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 3:52 PM

अट्टल गुन्हेगारांनी पाचपावलीतील बारमालक परमानंद तलरेजा यांचे अपहरण करून त्यांना तलवारीने मारून गंभीर जखमी केले. बेशुद्धावस्थेतील तलरेजा यांना मृत समजून आरोपींनी एका मैदानात फेकून दिले आणि पळून गेले. तक्रार मिळताच पोलिसांनी रात्रभर शोधाशोध करून तलरेजा यांना पहाटे गंभीर अवस्थेत ताब्यात घेतले.

ठळक मुद्देचार अट्टल गुन्हेगार गजाआड : साथीदार फरार : पाचपावलीतील घटनेने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अट्टल गुन्हेगारांनी पाचपावलीतील बारमालक परमानंद तलरेजा यांचे अपहरण करून त्यांना तलवारीने मारून गंभीर जखमी केले. बेशुद्धावस्थेतील तलरेजा यांना मृत समजून आरोपींनी एका मैदानात फेकून दिले आणि पळून गेले. तक्रार मिळताच पोलिसांनी रात्रभर शोधाशोध करून तलरेजा यांना पहाटे गंभीर अवस्थेत ताब्यात घेतले. तत्पूर्वीच चार आरोपींना अटक केली. काही आरोपी फरार आहेत. खंडणी वसुलीसाठी आणि आपली दहशत निर्माण करण्यासाठी हे अपहरण आणि हत्याकांड घडल्याचे पोलीस सांगतात.आकाश चिंचखेडे, मोनू समुद्रे, सौरभ तायवाडे आणि आकाश नागुलकर अशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.वैशालीनगरातील रहिवासी तलरेजा यांचा पाचपावलीत कमाल चौकाजवळ बियर बार आहे. रविवारी रात्री ११.४५ च्या सुमारास ते आपल्या बारसमोर बसून असताना उपरोक्त आरोपी तेथे आले. त्यांनी दारूच्या पैश्यावरून तलरेजा यांच्यासोबत वाद घातला. यानंतर त्यांना खंडणीची मागणी केली. त्यांनी नकार देताच घातक शस्त्राच्या धाकावर आरोपींनी तलरेजा यांना मारहाण करीत फरफटत नेले. काही अंतरावर असलेल्या कुख्यात अजय चिंचखेडेच्या घरी तलरेजा यांना आरोपी घेऊन गेले. तेथे त्यांच्यावर तलवारीचे घाव घातल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांचा मृत्यू झाला, असे समजून आरोपींनी बाळाभाऊ पेठेतील ग्राऊंडजवळ नेऊन तलरेजांना फेकून दिले.दरम्यान, आरोपींनी परमानंद तलरेजा यांना शस्त्राच्या धाकावर पळवून नेल्याची माहिती बारमधील एकाने नियंत्रण कक्षात फोन करून कळविली. त्यानंतर पाचपावलीचा पोलीस ताफा बारमध्ये पोहचला. तेथून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी तलरेजा तसेच आरोपींचा शोध घेणे सुरू केले. आजुबाजुच्या पोलीस ठाण्यातही बारमालकाचे कुख्यात गुंडांनी अपहरण केल्याची माहिती कळविण्यात आली. त्यामुळे गस्तीवरील पोलिसांना पहाटे तीन ते चारच्या सुमारास आरोपींना नंदनवनमध्ये पकडले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तलरेजांबाबत विचारणा करण्यात आली. तलरेजांना बाळाभाऊ पेठेतील एका मैदानात मारून फेकल्याचे आरोपींनी सांगितले. त्यामुळे पोलिसांचे धाबे दणाणले. पोलिसांनी लगेच आरोपींना घेऊन ते मैदान गाठले. तेथे रक्ताच्या थारोळ्यात तलरेजा पडून होते. ते जीवंत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना लगेच एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.मदतीला  धावलेल्यालाही मारलेपोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी कुख्यात गुन्हेगार आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, पोलिसांनी त्यांच्यावर एमपीडीएचीही कारवाई केली आहे. या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अजय चिंचखेडे हा १ मार्चलाच कारागृहातून बाहेर आला, हे विशेष!त्यांनी परमानंद यांना मारहाण करून त्यांचे बारसमोरून अपहरण केले, त्यावेळी बाजुला पान टपरी चालविणारा तलरेजा यांच्या मदतीला धावला. ते पाहून आरोपींनी त्या पान टपरीवाल्यालाही मारहाण केली. दरम्यान, पाचपावलीचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. केदारे यांनी प्रतीक परमानंद तलरेजा यांच्या तक्रारीवरून अपहरण करून हत्या करण्याच्या प्रयत्नाखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरणnagpurनागपूर