लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पैशाच्या वादावरून मेट्रोच्या चौकीदारावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. रोहित ऊर्फ सोनू साजन मलिक (वय २८, ठक्करग्राम), ऋषभ राधेश्याम चैनवार (वय २३, पिवळी मारबत चौक), सौरभ श्रीधर गोडे (वय २१) आणि विकास राजू भामोडे (वय २२, दोन्ही रा. लाल दरवाजा, तांडापेठ), अशी आरोपींची नावे आहेत.जखमीचे नाव आकाश मनोज पैसाडेली (वय २९, रा. स्वीपर कॉलनी, इंदोरा) आहे. तो मेट्रोमध्ये चौकीदार आहे. त्याने २०१७ मध्ये रोहित ऊर्फ सोनूमार्फत ७० हजार रुपये घेतले होते. दोन वर्षे होऊनही आकाशने पैसे परत केले नाही. त्यावरून त्यांच्यात खटके उडत होते. आकाश पैसे देत नसल्याचे पाहून रोहितने त्याचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार त्याने ऋषभ आणि सौरभ यांना आकाशला दाखविले. १५ मार्चला रात्री आकाश दुचाकीने कामावर येत होता. आरोपींनी गड्डीगोदाम चौकापासून त्याचा पाठलाग सुरू केला. सीताबर्डी पोलीस ठाण्यासमोर(वसाहती)जवळच्या मंदिरासमोर तो येताच आरोपींपैकी एकाने धडक मारून आकाशला खालीपाडले, नंतर एकाने चाकूने त्याच्या पाठीवर वार केला. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. समोरच ठाणे असल्याने सीताबर्डी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत मारेकरी पळून गेले होते. पोलिसांनी आकाशला मेयो रुग्णालयात दाखल केले. त्याची विचारपूस केली असता त्याने सांगितले की, दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी शस्त्राने मारल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.गोपनीयता अन् उलगडापोलिसांना रोहित ऊर्फ सोनू मलिकबाबत माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. त्यानंतर अन्य तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकी आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला. चारही आरोपींची १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडल्याने तीन दिवस होऊनही या घटनेची माहिती माहिती कक्षाला देण्याचे सीताबर्डी पोलिसांनी टाळले.
मेट्रोच्या चौकीदाराचा खून करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:03 AM
पैशाच्या वादावरून मेट्रोच्या चौकीदारावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना सीताबर्डी पोलिसांनी अटक केली.
ठळक मुद्देपोलीस ठाण्यासमोर गुन्हा : पैशाच्या वादातून हल्ला : चार आरोपींना अटक