शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

वीज कापल्यामुळे संतप्त नागरिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 11:06 PM

power cut Attempt of self-immolation वीज कनेक्शन कापल्यामुळे राजेश बंडे नावाच्या एका संतप्त नागरिकाने बुधवारी महावितरणच्या कार्यालयासमोरच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देमहावितरणच्या कार्यालयात खळबळ विदर्भ राज्य आंदोलन समिती व पोलिसांनी वाचवले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीज कनेक्शन कापल्यामुळे राजेश बंडे नावाच्या एका संतप्त नागरिकाने बुधवारी महावितरणच्या कार्यालयासमोरच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते व पोलिसांनी मध्यस्थी करीत त्याची समजून काढून त्याला वाचवले.

मिळालेल्या माहितीनुसार राजेश बंड हे जुनी मंगळवारी येथे राहतात. त्यांच्या वडिलांच्या नावावर वीज कनेक्शन आहे. राजेश हे टिफीन पोहोचविण्याचे काम करतात. त्यांच्यावर कोरोना काळातील ६५ हजार रुपयाचे वीजबिल थकीत होते. महावितरणने आज त्यांचे वीज कनेक्शन कापले. दरम्यान राजेश हे घरी आले तेव्हा त्यांना वीज कनेक्शन कापल्याचे समजले. कुठलीही पूर्वसूचना न देता कनेक्शन कापल्याने ते संतापले होते. ते थेट महावितरणच्या वर्धमाननगर येथील उपविभागीय कार्यालयात जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांना आपली व्यथा सांगितले. घरची परिस्थिती ठीक नाही. लहान मुली रात्रभर अंधारात कसे राहतील, असे सांगत लाइन जोडून देण्याची विनंती केली. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. अगोदर पैसे भरा नंतरच वीज जोडून मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे राजेश आणखीनच संतापले. ते कार्यालयाच्या बाहेर आले. महावितरण व सरकारच्या विराेधात घोषणा दिल्या आणि त्यांच्याजवळ असलेले रॉकेल स्वत:च्या अंगावर ओतून घेतले.

दुसरीकडे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते मागील अनेक दिवसांपासून वीज कनेक्शन तोडण्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. त्यांना राजेशबद्दल माहिती मिळाली. ते सोबत रॉकेल घेऊन गेल्याचेही समजले. त्यामुळे मुकेश मासुरकरसह कार्यकर्ते त्यांना शाेधत वर्धमाननगरातील कार्यालयात पोहोचले. त्याचवेळी पोलीसही तिथे आले होते. तेव्हा बंड हे स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न करीत होते. कार्यकर्ते, पोलीस व कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना समजावले. त्यांच्या हातातून माचीस हिसकावली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर पोलीस राजेश यांना आपल्यासाेबत घेऊन गेले.

जाणीवपूर्वक प्रयत्न; पोलिसात तक्रार

उपरोक्त घटना ही जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा दावा महावितरणने केला आहे. यासंदर्भात महावितरणचे म्हणणे आहे की, ६५,७१४ रुपये थकबाकी होती. वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने नाइलाजास्तव वीज कनेक्शन कापण्यात आले. राजेश बंड हे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांसोबत आले होते. ते वीजबिलाची रक्कम न भरता वीज जोडून देण्याची मागणी करीत होते. चर्चा करीत असतानाच त्यांनी आपल्या पिशवीतून बाटली काढली. त्यातील द्रव पदार्थ काढत आपल्या अंगावर टाकले. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांपैकी एकाने आगपेटी पेटवण्याचा प्रयत्न केला. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आगपेटी हिसकावून घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी महावितरणकडून लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लॉकडाऊन काळात कनेक्शन कापलेच कसे?

ग्राहक व कार्यकर्त्यांनी मिळून जाणीवपूर्वक हा सर्व प्रकार केल्याचे महावितरण सांगत असले तरी लॉकडाऊन काळात वीज कनेक्शन कापणे बंद आहे. ऊर्जामंत्र्यांनी तशी घोषणाही केली आहे. असे असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन काळात कनेक्शन कापलेच कसे, असा प्रश्नही विचारला जात आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणagitationआंदोलन