शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

नागपुरात दुरावलेल्या मैत्रिणीच्या हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - तीन वर्षांपासून संपर्कात असलेल्या मैत्रिणीने टाळणे सुरू केल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने तिच्यावर चाकूहल्ला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - तीन वर्षांपासून संपर्कात असलेल्या मैत्रिणीने टाळणे सुरू केल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने तिच्यावर चाकूहल्ला करून तिला गंभीर जखमी केले. पोट, पाठ, हात आणि डोक्यावर चाकूचे घाव बसल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यामुळे ती मेडिकलमध्ये मृत्यूशी झूुंज देत आहे. तर, भररस्त्यावर तरुणीवर चाकूहल्ला होत असल्याचे पाहून आजूबाजूची मंडळी धावली आणि त्यांनी हल्लेखोर तरुणाला पकडून त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्रनगर चौकात ही थरारक घटना घडली.

आरोपीचे नाव प्रशांत देवेंद्र बारसागडे (वय२४) असून तो देवरी, गोंदिया येथील रहिवासी आहे. जखमी तरुणी अनामिका (काल्पनिक नाव, वय २५) पारिचारिका असून ती नंदनवनच्या दर्शन कॉलनीत राहते. तिची आरोपी प्रशांतसोबत तीन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. ते सलग संपर्कातही होते. मात्र, घरच्यांच्या हे लक्षात आल्याने तरुणीच्या नातेवाईकांनी त्यांच्या संपर्क-संबंधाला हरकत घेतली. दरम्यान, प्रशांतचा स्वभाव लक्षात आल्याने काही दिवसांपासून तिने प्रशांतला टाळणे सुरू केले. त्याच्यासोबत भेटायला अन् बोलायलाही ती तयार नव्हती त्यामुळे प्रशांत चरफडत होता. ती दुसरीकडे कनेक्ट झाली असा संशय त्याला आल्यामुळे तो संतापला होता. या पार्श्वभूमीवर, पीडित तरुणी काम करीत असलेल्या रुग्णालयातून रात्रपाळी आटोपून पायी घराकडे निघाली. राजेंद्रनगर चौकातील शारदा बुक डेपोजवळ ती आली असता अचानक प्रशांत तिच्याजवळ आला. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने नकार देताच आरोपीने चाकू काढून तिला भोसकले. पोटावर, डोक्यावर वार करून तो छातीवर चाकू मारत असताना तरुणीने आपला हात आडवा केल्याने तिच्या हातालाही गंभीर जखम झाली. दरम्यान, मदतीसाठी ती ओरडू लागली. ते ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी प्रशांतला पकडून त्याची बेदम धुलाई केली. प्रशांतच्या हातातील चाकू हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात एका दुसऱ्या व्यक्तीला आणि प्रशांतलाही चाकूची जखम झाली.

दरम्यान, आज भारत बंदमुळे चौकाचौकात पोलीस होते. तरुणीवरील चाकूहल्ला तसेच नागरिक हल्लेखोराला बदडत असल्याचे पाहून बंदोबस्तावरील पोलीस तिकडे धावले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन नंदनवन पोलीस ठाण्यात नेले. तत्पूर्वी जखमी तरुणीला मेडिकलमध्ये नेण्यात आले. आरोपी प्रशांतला पोलिसांनी विचारणा केली असता त्याने जखमी तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगून ती टाळत असल्याने हल्ला केल्याची कबुली दिल्याचे समजते. ठाणेदार सांदिपान पवार यांनी प्रशांतविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

----

मोनिका, सानिका आणि अनामिका

प्रेमभंगामुळे प्रेयसीवर हल्ला करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करण्याच्या अनेक घटना यापूर्वी नागपुरात घडल्या आहेत. त्यातील सर्वाधिक खळबळ मोनिका किरणापुरे या तरुणीच्या हत्येने उडवून दिली होती. ११ मार्च २०११ ला ही घटना नंदनवनमध्येच घडली होती. दगाफटका केल्यामुळे संतापलेल्या काटोलच्या अनिल जयस्वाल नामक आरोपीने प्रेयसीची सुपारी देऊन हत्या करण्याचा कट रचला. या कटात कोणताही संबंध नसताना निष्पाप मोनिका किरणापुरे मारली गेली. त्यानंतर १ जुलै २०१८ ला सानिका थुगावकर या तरुणीची खामल्यातील आरोपी हेमनानी याने लक्ष्मीनगर चौकाजवळ भीषण हत्या केली होती. आता अनामिकाची तशाच पद्धतीने त्याच कारणासाठी हत्या करण्याचा प्रयत्न झाला.

---