शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

 नागपूर जिल्ह्यात उमरेड येथे महिलेच्या सतर्कतेने दरोड्याचा प्रयत्न ठरला अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2021 1:00 PM

Nagpur News उमरेड येथील सिंधी कॉलनी परिसरात दरोड्याचा प्रयत्न अपयशी ठरला. मंगळवारी मध्यरात्री १.४० ते १.४८ वाजताच्या सुमारास अंगाचा थरकाप उडविणारे नाट्य घडले.

ठळक मुद्देसात दरोडेखोरांनी केला पोबारा

लोकमत न्यूज नेटवर्कउमरेड : येथील सिंधी कॉलनी परिसरात दरोड्याचा प्रयत्न  अपयशी ठरला. मंगळवारी मध्यरात्री १.४० ते १.४८ वाजताच्या सुमारास अंगाचा थरकाप उडविणारे नाट्य घडले. केवळ आठ ते दहा मिनीटांच्या वेळातच दरोडेखोरांनी परिसरात ‘एन्ट्री मारली आणि पोबारा केला’ असा संपर्णू घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रसंगामुळे परिसरात दहशतीचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उमरेडच्या सिंधी कॉलनी परिसरात एकाच आवारात सेवकराम तोलानी, घनश्याम तोलानी आणि महेश तोलानी या तिनही बंधूच्या इमारती आहेत. सर्व गाढ झोपेत असताना दरोडेखोरांनी सेवकराम तोलानी यांच्या भिंतीवरून उडी मारत थेट महेश तोलानी यांच्या इमारतीकडे आगेकूच केली. एक एक करीत सातही दरोडे इमारतीच्या परिसरात शिरले. खिडक्यांची तावदाने तपासली. इमारतीच्या आत प्रवेश कसा करता येईल, याची चाचपणी देखील या दरोडेखोरांनी केली.

दरम्यान सगळेच गाढ झोपेत असताना दुसरीकडे प्रिया तोलानी या बेडरूमध्ये टि.व्ही बघत होत्या. शिवाय मोबाईल सुद्धा त्यांच्या हातात होता. अशातच त्यांच्या खोलीतील खिडकीतून टॉर्च चमकला. त्या लगेच सावध झाल्या. लागलीच त्यांनी मुलगा निकेश आणि सुनेला हाक दिली. निकेशने खिडकीजवळ पोहोचताच घराबाहेर दरोडेखोर असल्याचे लक्षात आले. ‘चोर-चोर’ च्या आवाजाने घरातील सारेच जागे झाले. आवाज घुमला आणि क्षणार्धात दरोडेखोरांनी पोबारा केला.

उमरेड पोलीसांना सूचना दिल्यानंतर लगबगीने पोलीस पोहाचले. त्यांनी त्या दिशेने शोधही घेतला परंतु पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून एकूण सात जणांच्या या टोळीमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले असून विविध चर्चेला ऊत आला आहे. वृत्त लिहीस्तोवर याप्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

दरवाजा उघडला असता तर...बाहेर एक नव्हे अनेक दरोडेखोर असल्याची बाब घरातील सदस्यांच्या ध्यानात येताच सर्वांचीच भंबेरी उडाली. खिडकीतून दरोडेखोर आमनेसामने दिसत होते. अशातच सर्वांनीच ‘चोर’ आल्याचा आरडाओरडा सुरू केला. सतर्कता बाळगत घराचा दरवाजा कुणीही उघडला नाही. कदाचित बाहेर कोण आहे, हे बघण्यासाठी दरवाजा उघडला गेला असता, तर मोठा अनर्थ झाला असता, अशीही बाब महेश तोलानी यांनी सांगीतली. ‘पोलीस पोलीस - चोर चोर’ या आवाजामुळे सातही चोरटे पळत सुटले.

माहिती कळताच पोलीस पोहोचले. वेगवेगळ्या चमू कामाला लागल्या.  चोरट्यांनी केवळ प्रयत्न केला. काहीही घडले नाही. यामुळे सध्या गुन्हा दाखल करण्यात आला नाही’’यशवंत सोलसेपोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन उमरेड--------------------

टॅग्स :Dacoityदरोडा