लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : तालुक्यातील लाेणारा परिसरात गुरे चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच स्थानिक तरुण व शेतकरी सतर्कही झाले आहेत. चाेरट्यांनी लाेणारा शिवारातून एक बैल व तीन गायी चाेरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणांच्या सतर्कतेमुळे चाेरट्यांना यात यश आले नाही. ही घटना रविवारी (दि. १६) मध्यरात्री घडली.
प्रमोद नागपुरे व किशोर नागपुरे, दाेघेही रा. लाेणारा, ता. कळमेश्वर यांची लोणारा-उपरवाही मार्गालगत शेती असून, त्यांची सर्व जनावरे शेतातील गाेठ्यातच बांधलेली असतात. प्रमाेद नागपुरे रविवारी रात्री शेतातकडे फेरफटका मारण्यासाठी गेले असता, त्यांना गाेठ्यातील एक बैल गायब असल्याचे आढळून आले. त्यांनी परिसरात शाेध घेतला. मात्र, उपयाेग झाला नाही. मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास प्रमोद नागपुरे, अतुल नागपुरे, अभी नागपुरे, नीलेश नागपुरे, अमर नागपुरे, राहुल भारसाकरे, राजू घोडे, अंकित नागपुरे, निखिल नागपुरे, वृषभ नागपुरे यांनी याच शिवारात बैलाचा शाेध घ्यायला सुरुवात केली. त्यांना तीन गायी व एक बैल उपरवाहीच्या दिशेने नेले जात असल्याचे दिसले. आपल्या मागावर नागरिक असल्याचे लक्षात येताच चाेरट्यांनी त्या जनावरांना साेडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्या तीन गायी किशाेर नागपुरे यांच्या असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
...
शेतकऱ्यांना आर्थिक फटका
महिनाभरापूर्वी प्रमोद नागपुरे यांच्या दोन गायी, तसेच २१ सप्टेंबर २०२० च्या मध्यरात्री सेलू, ता. कळमेश्वर येथील सुधाकर कुबडे यांचे दाेन बैल व पाच गायी, तसेच विजय गजभिये यांची बैलजाेडी चाेरट्यांनी चाेरून नेली. गुरांची संख्या कमी हाेत असून, किमती वाढल्या आहेत. जनावरे चाेरीला जात असल्याने शेतीची कामे प्रभावित हाेत असून, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. पाेलीस गुरांच्या चाेरीच्या घटनांचा तपास फारसा गांभीर्याने करीत नाहीत. चाेरून नेलेली जनावरे थेट कत्तलखान्यात नेली जात असल्याने ती सापडण्याची शक्यताही नसते. त्यामुळे पाेलिसांनी गुरे चाेरट्यांचा कायमचा बंदाेबस्त करण्याची मागणीही केली जात आहे.