शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नागपूर विधीमंडळ परिसरात ‘लोकराज्य’चे दुर्र्मिळ अंक वेधून घेताहेत सर्वांचे लक्ष; १९६४ पासूनचे विशेषांक उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 8:21 PM

राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचे प्रदर्शन दरवर्षीप्रमाणे यंदाही विधिमंडळ परिसरात भरवण्यात आले आहे. लोकराज्यचे विविध दुर्मीळ अंक यावेळीही लक्ष्य वेधून घेत आहेत.

ठळक मुद्देनागपूर व अमरावती विभाग माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम

आॅनलाईन लोकमतनागपूर : हिवाळी अधिवेशनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाने हा उपक्रम राबविला आहे. या प्रदर्शनात १९६४ पासूनचे अनेक विशेषांक पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये बालगंधर्व विशेषांक, शाहू महाराज यांच्या राज्यरोहण सोहळा शताब्दीनिमित्त प्रकाशित विशेषांक, धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव विशेषांक, ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी (नोव्हेंबर १९९०), सानेगुरुजी, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, महात्मा गांधी, स्वातंत्र्य दिन, विदर्भ विशेषांक (२०११ व २०१७) अखिल भारतीय साहित्य संमेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विशेषांक, निवडणूक, शेती, सिंचन, बेटी बचाव संदर्भातील विशेषांक, शिक्षण, वन, पर्यटन यासह इतरही विषयाला परिपूर्ण वाहिलेले विशेषांकही उपलब्ध आहेत.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्र वार्षिकी’ व ‘महामानव’ ही पुस्तके विक्रीस ठेवण्यात आली आहेत.सुरुवातीच्या काळात लोकराज्य अंक हे कृष्णधवल (ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट) मुद्रित केलेले असायचे. २००६ पासून लोकराज्य मासिक रंगीत स्वरुपात मुद्रित करून वाचकांच्या हातात पडू लागले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, उपसंचालक(पुणे) मोहन राठोड, उपसंचालक (वृत्त) गोविंद अहंकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.दिवंगत माजी राज्यपाल रा.सू. गवई यांच्या जीवनकार्यावरील ‘अजातशत्रू’ स्मृतिग्रंथमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रामार्फत दिवंगत माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे जीवनकार्य व त्यांच्या विधिमंडळ आणि संसदीय कामकाजाच्या योगदानाची माहिती जनतेस होण्यासाठी ‘अजातशत्रू’ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन मुंबईत २५ जुलै रोजी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात करण्यात आले. हा ग्रंथही येथे प्रदर्शनास व विक्रीसाठी उपलब्ध आहे.

टॅग्स :Governmentसरकार