शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

महिलांसाठी आकर्षक हेअर पिन्स येणार आता थेट पेंच व्याघ्र प्रकल्पातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 9:30 PM

महिलांच्या लांब केसांना सांभाळणाऱ्या आकर्षक हेअर पिन्स आता थेट पेंच व्याघ्र प्रकल्पातून येणार आहेत. विशेष म्हणजे अत्यंत लवचिक असणाऱ्या घाणेरी वनस्पतीपासून त्या बनविल्या जाणार आहेत. यासोबतच की-चेन, कपडे लटकविण्याचे हँगर, ट्रे, फ्रुट बास्केट, फुलदाणी, खुर्ची ,टेबल आदी विविध वस्तू नागपूरच्या बाजारात लवकरच दाखल होणार आहेत.

ठळक मुद्देघाणेरी वनस्पतीपासून निर्मिती : आदिवासींना रोजगाराची संधी

आॅनलाईन लोकमतनागपूर : महिलांच्या लांब केसांना सांभाळणाऱ्या आकर्षक हेअर पिन्स आता थेट पेंच व्याघ्र प्रकल्पातून येणार आहेत. विशेष म्हणजे अत्यंत लवचिक असणाऱ्या घाणेरी वनस्पतीपासून त्या बनविल्या जाणार आहेत. यासोबतच की-चेन, कपडे लटकविण्याचे हँगर, ट्रे, फ्रुट बास्केट, फुलदाणी, खुर्ची ,टेबल आदी विविध वस्तू नागपूरच्या बाजारात लवकरच दाखल होणार आहेत.सातपुडा फाऊंडेशनच्यावतीने यासंबंधीचे एक प्रशिक्षण नुकतेच पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात राहणाऱ्या युवक युवतींना देण्यात आले. घाणेरी (लँटेना) या वनस्पतीपासून या आकर्षक वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील सुवरधरा, चारगाव व शीलादेवी या गावांमधील एकूण अकरा युवक युवतींना देण्यात आले. प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींनी घाणेरीपासून तयार केलेल्या हेअर पिन, की चेन, कपडे लटकविन्याचे हँगर, ट्रे, फ्रूट बास्केट, फुलदाणी, खुर्ची, टेबल या वस्तू तयार केल्यात.घाणेरीचा फर्निचर व वस्तू बनविण्यासाठी वापर करण्याच्या संकल्पनेचे शिल्पकार व सातपुडा फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे यांनी युवकांना हा रोजगार उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळवून देण्याची घोषणा केली. सातपुडा फाऊंडेशनतर्फे सुरुवातीला या वस्तू पेंच येथील कोलितमारा व सिल्लारी पर्यटन संकुल तसेच जन-वन स्टोल्स वर उपलब्ध करून देण्यात येतील व दुसऱ्या टप्प्यात नागपुरातील निवडक दुकानांमध्ये या वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रशिक्षणाच्या उद्घाटनाला सुवरधरा समितीचे अध्यक्ष ईश्वर सहारे, सातपुडा फाऊंडेशनचे सहायक संचालक अभिजित दत्ता, संवर्धन अधिकारी बंडू उईके, दिलीप लांजेवार, वनपाल एस. बी. राउत व गावकरी उपस्थित होते. वनपरिक्षेत्राधिकारी नीलेश गावंडे यांनी प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक ऋषिकेश रंजन यांनी या प्रशिक्षणासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमधून आर्थिक साहाय्य मिळवून दिले. सातपुडा फाऊंडेशनचे बंडू उईके व दिलीप लांजेवार यांनी 'लँटेना क्राफ्ट' विक्रीकरिता बाजारपेठ मिळविण्यासाठी आपण मदत करू असे सांगितले. सातपुडा फाऊंडेशनचे सहायक संचालक अभिजित दत्ता व क्षेत्र सहायक बाळकृष्ण बगमारे यांनी चित्रफित दाखविली. यावेळी प्रशिक्षक शत्रूघ्न वरठी यांनी प्रशिक्षनार्थींनी दाखविलेल्या कौशल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शिलादेवी येथील प्रशिक्षणार्थी अरुण नेईकाम, महिला सदस्य दीपाली व सुरेखा यांनी आपल्याला आता रोजगाराची खात्री झाल्याचे सांगितले.

टॅग्स :Womenमहिलाnagpurनागपूर