शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

औरंगाबाद ते नागपूर तब्बल ६०० किलोमीटरचा ग्रीन कॉरिडॉर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:28 PM

अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे यातना सहन करत असलेले रुग्ण आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असलेल्या नातेवाईकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. कालपर्यंत सोर्इंअभावी नागपूरसह विदर्भातून ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) रुग्णाचे अवयव राज्याबाहेर पाठविले जायचे. परंतु आता दुसऱ्या शहरातून अवयव नागपुरात येत आहेत. शुक्रवारी औरंगाबाद येथून तब्बल ६०० किलोमीटरचे अंतर कापत केवळ साडेपाच तासात ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने यकृत नागपुरात पोहचले. ही पहिलीच घटना ठरली. १५ वर्षीय दात्याकडून अवयवदान झाल्याने लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये त्याचे यशस्वी प्रत्यारोपण होऊन ३७ वर्षीय रुग्णाला जीवनदान मिळाले.

ठळक मुद्देपहिलीच घटना : साडेपाच तासात आले यकृत : १५ वर्षीय मुलाचे अवयवदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे यातना सहन करत असलेले रुग्ण आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असलेल्या नातेवाईकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. कालपर्यंत सोर्इंअभावी नागपूरसह विदर्भातून ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) रुग्णाचे अवयव राज्याबाहेर पाठविले जायचे. परंतु आता दुसऱ्या शहरातून अवयव नागपुरात येत आहेत. शुक्रवारी औरंगाबाद येथून तब्बल ६०० किलोमीटरचे अंतर कापत केवळ साडेपाच तासात ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने यकृत नागपुरात पोहचले. ही पहिलीच घटना ठरली. १५ वर्षीय दात्याकडून अवयवदान झाल्याने लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये त्याचे यशस्वी प्रत्यारोपण होऊन ३७ वर्षीय रुग्णाला जीवनदान मिळाले.प्रतीक बाबासाहेब वाहुळकर (१५) रा. निसरवाडी गल्ली नं. ६ औरंगाबाद, असे त्या ब्रेन डेड मुलाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, १९ जून रोजी एका दुचाकीवरून प्रतीक व त्याचे दोन मित्र प्रवास करीत असताना दुचाकी रस्ता दुभाजकावर धडकली. यात प्रतीक गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला जबर मार बसला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी ‘ब्रेनडेड’ झाल्याची घोषणा केली. डॉक्टरांनी त्याचे वडील बाबासाहेब यांना अवयवदानाची कल्पना दिली. वडिलांनी त्या दु:खातही अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार हृदय, यकृत, दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले. हृदय फोर्टीज हॉस्पिटल मुंबई, दोन्ही मूत्रपिंड औरंगाबाद येथील हॉस्पिटलला तर यकृत नागपूर येथील न्यू इरा हॉस्पिटलला देण्यात आले.-पहिल्यांदाच ‘सोटो’ प्रणालीराज्यातील अवयव प्रत्यारोपण चळवळीचा वेग वाढावा, त्यात नव्या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाची मदत घेता यावी यासाठी केंद्र सरकारने राज्यात विभागीय अवयव उती प्रत्यारोपण समिती (सोटो) आणि राज्य उती प्रत्यारोपण समितीची (सोटो) स्थापना केली आहे. प्रतीक याचा रक्तगट औरंगाबाद येथील रुग्णाशी जुळत नसल्याने त्यांनी ‘सोटो’ला कुठे यकृताची गरज असलेला रुग्ण उपलब्ध आहे का, याची विचारणा केली. त्यानुसार नागपुरात रुग्ण असल्याचे आढळून आल्याने पहिल्यांदाच ‘सोटो’ प्रणालीच्या मदतीने नागपूरच्या रुग्णाला यकृत मिळाले. या प्रक्रियेत झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर, नागपूरची (झेडटीसीसी) भूमिका महत्त्वाची राहिली. या सेंटरच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्यासह डॉ. सुधीर टॉमी व नागपूर झोन कॉर्डीनेटर वीणा वाठोरे यांचे विशेष योगदान राहिले.औरंगाबाद ते नागपूर विमान सेवा वापरणे अशक्य झाल्याने यकृत सडक मार्गाने नेण्याचा निर्णय घेण्यात आला. कमीतकमी वेळात हे ६०० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी रुग्णवाहिकेच्या जागी ‘मर्सिडीज बेन्झ’ची मदत घेण्यात आली. यामुळे साडेपाच तासांत यकृत नागपुरात पोहचणे शक्य झाले.- न्यू इरा हॉस्पिटलमध्ये सहावे प्रत्यारोपणब्रेन डेड रुग्णाच्या शरीरातून यकृत काढल्यानंतर आठ तासांत प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. त्या दृष्टीने न्यू इरा हॉस्पिटलमध्ये तशी तयारी करण्यात आली होती. यकृत मिळताच ३७ वर्षीय पुरुषावर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. येथील यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. सोमंत चटोपध्याय व हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती, डॉ. नीलेश अग्रवाल, वीरेंद्र किर्नाके यांच्यासह डॉ. अमोल कोकस, डॉ. पंकज ढोबळे, डॉ. सोनाली सराफ, डॉ. साहिल बंसल, डॉ. सविता जयस्वाल आदींचा शस्त्रक्रियेत सहभाग होता. केवळ दोन महिन्यात लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये हे सहावे तर नागपुरातील सातवे यकृत प्रत्यारोपण आहे.-ग्रीन कॉरिडॉरमध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाचीअवयवदान प्रक्रियेत अवयव सडक मार्गाने काही तासांत दुसºया रुग्णापर्यंत पोहोचविण्यात ग्रीन कॉरिडॉर महत्त्वाची भूमिका बजावते. हे पोलिसांमुळेच शक्य होते. औरंगाबाद ते नागपूर हा मार्ग ग्रीन कॉरिडॉर करण्यासाठी या मार्गावरील पोलीस ठाण्यांची मोठी मदत राहिली. या शिवाय निवृत्त सहायक पोलीस आयुक्त जमील अहमद, वाहतूक शाखा क्रमांक एकचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर, वाहतूक शाखा क्रमांक दोनचे पोलीस निरीक्षक अतुल सबनीस आणि वाहतूक शाखा क्रमांक तीनचे पोलीस निरीक्षक फुलपगारे यांनीही आपली जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली.

 

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर